US FDA Approve Pfizer Booster Dose : अमेरिकेत फायझरचा कोविड बूस्टर डोस मंजूर झाला आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) त्याला मान्यता दिली आहे. एफडीएच्या तज्ज्ञ सल्लागारांच्या पॅनेलने म्हटले आहे की, फायझर इंक आणि बायोटेक एसईने बनवलेला कोविड बूस्टर डोस अशा व्यक्तींना द्यावा जे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. us fda approve pfizer booster dose for above 65 year age
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेत फायझरचा कोविड बूस्टर डोस मंजूर झाला आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) त्याला मान्यता दिली आहे. एफडीएच्या तज्ज्ञ सल्लागारांच्या पॅनेलने म्हटले आहे की, फायझर इंक आणि बायोटेक एसईने बनवलेला कोविड बूस्टर डोस अशा व्यक्तींना द्यावा जे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत.
तरुणांना बूस्टर डोस देण्याचा प्रस्ताव नाकारला
एफडीए आणि फायझरने मुळात 16 आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील कोविड बूस्टर डोससाठी मंजुरी मागितली होती, परंतु त्यांचा प्रस्ताव सल्लागारांनी नाकारला. यावर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांचा सपोर्ट डेटा खूप कमी आहे आणि हे विशेषतः तरुणांसाठी धोक्याचे ठरू शकते.
अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाच्या तज्ज्ञ सल्लागारांच्या पॅनेलने 16 आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी कोरोना लस बूस्टर डोस मंजूर करण्याच्या विरोधात व्यापकपणे मतदान केले, परंतु पॅनेलने 65 वर्षांवरील आणि उच्च जोखमीच्या रुग्णांसाठी बूस्टर डोस मंजूर केला आहे.
पॅनेलने इमर्जन्सी यूजच्या बाजूने 18-0 ने मतदान केले. 65 वर्षांवरील सर्वांसाठी आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या उच्च जोखमीच्या रुग्णांसाठी फायझरचा बूस्टर डोस मंजूर करण्यात आला आहे.
एफडीएकडून अद्याप अंतिम मंजुरी देणे आवश्यक आहे आणि रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रासाठी बाह्य सल्लागार पॅनेल पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत बूस्टर शॉट वापरासाठी तपशीलवार शिफारसी करेल.
जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच म्हटले होते की, जगातील बहुतांश देश कोरोनाचा एक डोस देण्यासाठीही संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीत या वर्षाच्या अखेरपर्यंत तरी कोरोना बूस्टर डोस दिले जाऊ नयेत.
दुसरीकडे, जगातील सर्वात मोठे लस निर्मिती संस्था सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी कोविड लसीचा बूस्टर डोस अनैतिक असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, अनेक देश लस मिळवण्यासाठी संघर्ष करत असताना बूस्टर डोस सुरू करणे अनैतिकच आहे.
us fda approve pfizer booster dose for above 65 year age
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप नेत्याच्या अटकेसाठी अलिगडमध्ये आलेल्या बंगाल पोलिसांना मारहाण, मुख्यमंत्री ममतांच्या शिरावर ठेवले होते 11 लाखांचे इनाम
- महाराष्ट्रातील अत्याचार थांबेनात! आई शेतात-नराधमांकडून गतिमंद घरात घुसून बलात्कार
- कोविड-19 लसीचा तिसरा डोस ‘अनैतिक’ आहे, सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांचे प्रतिपादन
- संजय राऊत यांनी केली पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा, म्हणाले- त्यांच्या तोडीचा कोणीही नाही
- पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर संक्रांत; सायंकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक; नवज्योत सिध्दू कँप जोमात