• Download App
    US Banking Crisis : आता फर्स्ट रिपब्लिक बँक ठप्प लॉक, अवघ्या आठवडाभरात तिसऱ्या अमेरिकी बँकेला टाळे! पुन्हा मंदीच्या दिशेने!!|US Banking Crisis Now the First Republic Bank is locked, the third American bank is blocked in just a week! Back to recession!!

    US Banking Crisis : आता फर्स्ट रिपब्लिक बँक ठप्प लॉक, अवघ्या आठवडाभरात तिसऱ्या अमेरिकी बँकेला टाळे! पुन्हा मंदीच्या दिशेने!!

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : अमेरिकन बँकिंग क्षेत्रात आलेली त्सुनामी थांबण्याचे नाव घेत नाहीये. सर्वप्रथम सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सिग्नेचर बँक बंद झाली. आता फर्स्ट रिपब्लिक बँकेलाही टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. अवघ्या आठवडाभरातील ही तिसरी मोठी बँक आहे, जिची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.US Banking Crisis Now the First Republic Bank is locked, the third American bank is blocked in just a week! Back to recession!!

    बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण

    ब्लूमबर्गच्या मते, फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या स्टॉकमध्ये 61.83% ने घट झाली. गेल्या आठवड्यातील घसरण पाहिल्यास, फर्स्ट रिपब्लिक बँक स्टॉकची किंमत 74.25%ने घसरली आहे. शेवटच्या ट्रेडिंग दिवशी त्याची किंमत प्रति शेअर 19 डॉलरच्या नीचांकी पातळीवर पोहोचली होती. अशीच काहीशी परिस्थिती सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँकेत निर्माण झाली आणि या दोन्ही बँकांना टाळे लागले. आता ही मोठी बँकही कोसळण्याची शक्यता आहे.



    मूडीजने ठेवले अंडररिव्ह्यू

    जागतिक पतमानांकन एजन्सी मूडीजने 6 अमेरिकन बँकांमध्ये पहिल्या क्रमांकावर फर्स्ट रिपब्लिक बँकेचे नावदेखील समाविष्ट केले आहे, त्यांचा आढावा घेण्यात आला आहे. याशिवाय, रेटिंग एजन्सीने Zions Bancorporation, Western Aliens Bancorp, Comerica Inc, UMB Financial Corp आणि Intrust Financial Corporation यांचे रेटिंगदेखील कमी केले आहे आणि त्यांचेही रिव्ह्यू केले आहे.

    यापूर्वी, मूडीजने सिग्नेचर बँकेला ‘सी’ मानांकन दिले होते. परंतु सोमवारी, न्यूयॉर्क-आधारित सिग्नेचर बँकेचे कर्ज रेटिंगदेखील जंक टेरिटरीमध्ये डाउनग्रेड करण्यात आले. एजन्सीचे हे पाऊल अमेरिकन बँकिंग क्षेत्राला मोठा धक्का आहे.

    2008च्या मंदीसारखी परिस्थिती?

    अमेरिकेतील बँक क्रॅशमुळे 2008 सारख्या मंदीचा धोका अधिक गडद होऊ लागला आहे. त्या वर्षी बँकिंग फर्म लेहमन ब्रदर्सने स्वतःला दिवाळखोर घोषित केले होते. यानंतर अमेरिकेसह संपूर्ण जगात आर्थिक मंदी आली होती आणि अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले होते. जर आपण अमेरिकन बँकिंग इतिहासावर नजर टाकली तर 2008 नंतर बँकिंग क्षेत्रातील दुसरे मोठे शटडाउन सिलिकॉन व्हॅली बँक बंद पडणे आहे. यानंतर लगेचच तिसरी सिग्नेचर बँक आणि आता फर्स्ट रिपब्लिकच्या रूपाने चौथी बँक बंद होण्याच्या मार्गावर आहे.

    मंदीच्या तडाख्यात आणखी बँका बुडण्याची शक्यता

    दरम्यान, अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील या त्सुनामीत बुडालेल्या बँकांच्या यादीत आणखी काही नावे येण्याची शक्यता ज्येष्ठ अमेरिकन गुंतवणूकदार बिल अॅकमन यांनी व्यक्त केली आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेमुळे अनेक बँकांवर परिणाम होईल. अॅकमन यांच्या मते, अमेरिकन प्राधिकरणाच्या हस्तक्षेपानंतरही अनेक बँका बुडण्याची शक्यता आहे.

    US Banking Crisis Now the First Republic Bank is locked, the third American bank is blocked in just a week! Back to recession!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या