विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : अमेरिकन प्रशासनाची भारतविरोधी भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. अमेरीकेच्या जो बायडेन प्रशासनाने भारतात वाढत्या बलात्काराच्या घटना आणि जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादामुळे अमेरिकेच्या नागरीकांना भारतात प्रवास करण्यासंदर्भात पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले आहे.US anti-India propaganda once again, instructing citizens to avoid travel due to increase in rape cases in India
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोलने भारतात कोरोनाच्या तिसºया लाटेचा संदर्भ देत भारतात प्रवास करण्याबाबत विचार करावा, अशी नोटीस जारी केली होती. यानंतर थोड्या वेळातच जो बायडेन प्रशासनाने आणखी एक नोटीस काढत भारतात जम्मू-काश्मीरमध्ये भारत- पाकिस्तान सीमेजवळ दहशतवादीचा धोका आहे.
त्याचबरोबर बलात्काराच्या अनेक घटना पर्यटनस्थळ तसेच अनेक ठिकाणी उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे भारतात प्रवास करण्यासंदर्भात पुनर्विचार करा, असा सल्ला नागरिकांना दिला आहे.मात्र, अमेरिकेने हे निर्देश देताना कोणत्याही प्रकारचा डाटा दिलेला नाही.
पुरावेही दिलेले नाहीत. त्यामुळे अमेरिकेच्या या निर्देशामागे कोणताही आधार नाही, असेही म्हटले जात आहे. भारताकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
US anti-India propaganda once again, instructing citizens to avoid travel due to increase in rape cases in India
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशातून गुन्हेगारीचा उच्चाटन करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आता गॅँगस्टरच्या पत्नी उतरल्या
- तुम्ही आता राज्यच केंद्राला चालविण्यासाठी द्या, चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना टोला
- मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडून राष्ट्रध्वजाचा अवमान, रश्मी ठाकरे यांच्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
- टीसीएसने रचला इतिहास : अमेरिकेच्या आयबीएमला पछाडत बनली दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी, इन्फोसिस वेगाने वाढणारा ब्रँड