UAE Travel Ban : संयुक्त अरब अमिरातीचे नागरिक यापुढे कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये प्रवास करू शकणार नाहीत. यूएईने आपल्या नागरिकांना 21 जुलैपर्यंत या देशांमध्ये प्रवास न करण्याचे आदेश जारी केले आहेत. बंदी घातलेल्या देशांच्या यादीत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका यांची नावे समाविष्ट आहेत. प्रशासनाच्या हवाल्याने अनेक माध्यमांतून ही माहिती देण्यात आली आहे. United Arab Emirates UAE Travel Ban to its citizens in India Pakistan Nepal and Other Countries Amid Corona Crisis
विशेष प्रतिनिधी
दुबई : संयुक्त अरब अमिरातीचे नागरिक यापुढे कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये प्रवास करू शकणार नाहीत. यूएईने आपल्या नागरिकांना 21 जुलैपर्यंत या देशांमध्ये प्रवास न करण्याचे आदेश जारी केले आहेत. बंदी घातलेल्या देशांच्या यादीत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका यांची नावे समाविष्ट आहेत. प्रशासनाच्या हवाल्याने अनेक माध्यमांतून ही माहिती देण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे हवाले देऊन माहिती देण्यात आली आहे. यासह देशातील नागरिकांना प्रवासादरम्यान सर्व प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्यास सांगितले गेले आहे जेणेकरून कोरोनाच्या प्रसाराला रोखता येईल. या आदेशापूर्वी जून महिन्यात14 देशांवर लादलेली प्रवासी बंदी 21 जुलैपर्यंत वाढविण्यात आली.
मालवाहू विमानांना सवलत
संयुक्त अरब अमिरातीच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने नोटीस बजावत म्हटले आहे की, 14 देशांमधून- लायबेरिया, नामीबिया, सिएरा लिओन, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, युगांडा, झांबिया, व्हिएतनाम, भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिकेतील उड्डाणे 21 जुलैपर्यंत बंद आहेत. तथापि, मालवाहू विमान, व्यवसायाशी संबंधित विमान आणि चार्टर्ड विमानांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
नागरिकांसाठी नियमावली
यूएईने आपल्या नागरिकांना प्रवासादरम्यान कोरोना विषाणूची लागण झाल्यास स्वत:ला विलगीकरणात ठेवण्यास सांगितले आहे. सर्व आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे पाळण्यास आणि संबंधित देशातील आरोग्य प्रोटोकॉलचे अनुसरण करण्यास सांगितले आहे. याव्यतिरिक्त लोकांना असेही सांगण्यात आले आहे की, जर त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले तर त्या देशातील यूएई दूतावासालाही कळवावे. जगभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गात वाढ होत आहे. व्हायरसच्या नवीन प्रकारांमुळे चिंतेत भर पडली आहे.
United Arab Emirates UAE Travel Ban to its citizens in India Pakistan Nepal and Other Countries Amid Corona Crisis
महत्त्वाच्या बातम्या
- Tokyo Olympics : मान पटेलने रचला इतिहास, ऑलिम्पिक क्वालिफाय करणारी भारताची पहिली महिला जलतरणपटू बनली
- राज्यपाल कोश्यारींच्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंचे पत्रानेच उत्तर; अधिवेशन, अध्यक्षपद अन् ओबीसी आरक्षणावर दिले स्पष्टीकरण
- पहाटेच्या अंधारात पाकिस्तानी हेक्झाकॉप्टर ड्रोनचा भारतात प्रवेशाचा प्रयत्न, सतर्क बीएसएफ जवानांनी फायरिंग केल्याने माघारी परतले
- OBC Reservation : कोरोनामुळे पोटनिवडणुका पुढे ढकलण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळल्यावर संभाजीराजेंनी सांगितले शेवटचे दोन पर्याय