• Download App
    चॉकलेट घ्या अन् मत द्या! पाकमध्ये निवडणूक प्रचाराची अनोखी तऱ्हा, नेटकरी म्हणाले, स्मार्ट उमेदवार! । Unique way of election campaign in Pakistan using chocolate, Social Users Calling smart candidate

    चॉकलेट घ्या अन् मत द्या! पाकमध्ये निवडणूक प्रचाराची अनोखी शक्कल, नेटकरी म्हणाले, स्मार्ट उमेदवार!

    election campaign in Pakistan : निवडणूक प्रचाराच्या एकापेक्षा एक तऱ्हा तुम्ही पाहिल्या असतील. परंतु पाकमधील एका उमेदवाराच्या प्रचाराच्या पद्धतीने या सर्वांवर मात दिली आहे. निवडणुकीत विजय मिळेल की नाही, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. परंतु या उमेदवाराने मात्र आपल्या अनोख्या प्रचाराने आपल्या प्रशंसकांचे हृदय जिंकले आहे. पाकिस्तानच्या कराचीमध्ये पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात मिफ्ता इस्माईल नावाचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यांनीच ही अनोखी शक्कल प्रचारासाठी लढवली आहे. Unique way of election campaign in Pakistan using chocolate, Social Users Calling smart candidate


    विशेष प्रतिनिधी

    कराची : निवडणूक प्रचाराच्या एकापेक्षा एक तऱ्हा तुम्ही पाहिल्या असतील. परंतु पाकमधील एका उमेदवाराच्या प्रचाराच्या पद्धतीने या सर्वांवर मात दिली आहे. निवडणुकीत विजय मिळेल की नाही, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. परंतु या उमेदवाराने मात्र आपल्या अनोख्या प्रचाराने आपल्या प्रशंसकांचे हृदय जिंकले आहे. पाकिस्तानच्या कराचीमध्ये पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात मिफ्ता इस्माईल नावाचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यांनीच ही अनोखी शक्कल प्रचारासाठी लढवली आहे.

    नवाझ शरीफ यांचा पक्ष PML-Nचे मिफ्ता इस्माईल हे उमेदवार आहेत. व्यवसायाने ते एक चॉकलेट निर्माते आहेत. त्यांची इस्माईल इंडस्ट्रीज नावाने कंपनीही आहे. कँडीलँड आणि बिस्कोनी नावाची कंपनी या इंडस्ट्रीजचा भाग आहेत. इस्माईल यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या व्यावसायिक कौशल्याचा वापर केला आहे. त्यांनी आपला फोटो आणि मतदारसंघाची निशाणी असलेली कँडी बाजारात विक्रीला आणली आहे. कँडीच्या या छोट्या पॅकवर एका बाजूला त्यांचे नाव ‘मिफ्ता’ आणि त्यांचा फोटो आहे. तर दुसऱ्या बाजूवर NA-249 हे मतदारसंघ आणि पक्षाचे नाव छापलेले आहे.

    सोशल मीडियावर कौतुक

    सोशल मीडियावर या अनोख्या प्रयोगाचे कौतुक होत आहे. अनेक युजर्सनी त्यांना स्मार्ट उमेदवार ठरवले आहे. तर काही जण त्यांच्यावर टीकाही करत आहेत. मिफ्ता इस्माइल यांनीही प्रचाराचे अनेक ट्वीट रिट्वीट केले आहेत.

    कोण आहेत मिफ्ता इस्माइल?

    मिफ्ता इस्माइल पाकिस्तानातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. 2018 मध्ये ते पाकचे अर्थमंत्रीही होते. यापूर्वी त्यांनी अनेक उच्च पदांवर काम केलेले आहे. पाकच्या गुंतवणूक बोर्डाचे संचालक पदही त्यांनी भूषवलेले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेसोबतही त्यांनी काम केलेले आहे. 2011 पासून ते नवाझ शरीफ यांच्या पक्षाशी जोडलेले आहेत. कराचीच्या NA-249 मतदारसंघात 29 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

    Unique way of election campaign in Pakistan using chocolate, Social Users Calling smart candidate

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या

    Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प इटलीच्या PM मेलोनींना भेटले; युरोपियन युनियनशी व्यापार कराराचे आश्वासन