विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – आगामी काळात अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक केली नाही तर देशातील लाखो लोक गरीब आणि भुकबळीच्या गर्तेत लोटले जातील, असा इशारा संयुक्त राष्ट्राची राजदूत डेबरोह लिओन्स यांनी दिला आहे.UN request for Afghan economy
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था डबघाईला येत आहे. नागरिकांचे होणारे पलायन आणि चलनाचे अवमूल्यन पाहता अफगाणिस्तानची भविष्यातील स्थिती आणखी भयावह राहू शकते.
संयुक्त राष्ट्राच्या विशेष राजदूत लिओन म्हणाल्या की, अफगाणिस्तानची कोलमडून पडलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी जगाने पुढे यायला हवे. तसेच तालिबानच्या राजवटीमुळे शेजारील देशांना मोठा धोका निर्माण झाल्याची भीतीही दूर केल्यास व्यवहार पूर्ववत होऊ शकतात.
अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या स्थितीमुळे नागरिकांवर मोठे संकट येण्याची शक्यता असून त्यावर मार्ग काढण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करायला हवेत. एवढेच नाही तर अफगाणिस्तानसमोर आर्थिक संकट आ वासून उभे राहिले आहे. कारण अफगाणिस्तानची अब्जावधींची मालमत्ता गोठवली गेली आहे.
मालमत्ता अशाच रीतीने गोठवणे सुरू राहिले तर अर्थव्यवस्थेचा बोऱ्या वाजेल आणि त्यामुळे लाखो गरिबीत ढकलले जातील आणि भूकबळीचे संकट आणखी गडद होईल. परिणामी अफगाणिस्तान सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढू शकते. तसेच अफगाणिस्तान अनेक पिढ्या मागे जाईल.
UN request for Afghan economy
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेत ४० हजार अफगाण निर्वासित आश्रयाला, अन्य देशांपेक्षा घेतली आघाडी
- मोदी सरकारमध्ये ११ महिला मंत्री, ५० महिला खासदार, १०० पेक्षा अधिक महिला आमदार; राहुल गांधींना सुनावले खडे बोल
- लव जिहाद आणि नार्कोटिक्स जिहादवर टीका करणाऱ्या बिशपविरुद्ध केरळचे डावे सरकार खटला भरणार नाही
- भारतात अडकलेले 2142 अफगाणी विद्यार्थी आहेत आर्थिक अडचणीत , गरीब कुटुंब अफगाणिस्तानमधून पाठवू शकत नाही पैसे