विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : जगभरातील ५७ विकसनशील देशांमधील निम्म्यापेक्षा जास्त महिलांना त्यांच्या जोडीदाराबरोबर शारीरिक संबंधांना नकार देण्याचे स्वातंत्र्य नाही, असा दावा संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) एका अहवालात करण्यात आला आहे. अहवालात जगाच्या केवळ एक चतुर्थांश देशांची माहिती असून त्यातील निम्मे देश आफ्रिका खंडातील आहेत.UN report says condition of women in third world
मात्र स्वतःच्या शरीरासंबंधीचे निर्णय घेण्याचा अधिकार नसलेल्या आणि भय, हिंसाचाराविना त्यांच्या भविष्याचा विचार न करू शकणाऱ्या लाखो महिला आणि मुलींच्या शारीरिक स्थितीसंबंधी भयावहता यातील निष्कर्षांमधून हे लक्षात येते.
‘लोकसंख्या कोष’ने म्हटले आहे की, जोडीदाराबरोबर शारीरिक संबंध हवेत की नको हे ठरविण्यास, गर्भनिरोधक साधनांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यास आणि लैंगिक व प्रजनन आरोग्य सेवेची मागणी करण्यास ५७ देशांमधील केवळ ५५ टक्के मुली आणि महिला सक्षम आहेत. म्हणजेच निम्म्या महिलांचा हा अधिकार धुडकावला जातो.
पूर्व आणि आग्नेय आशिया, लॅटिन अमेरिका, कॅरेबियन देशांमध्ये ७६ टक्के महिला व किशोरवयीन मुलींना लैंगिक संबंध ठेवण्याचा, गर्भनिरोधक वापरण्याचा आणि आरोग्य देखभालीचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. आफ्रिकेतील सहारा प्रदेश, मध्य व पश्चिरम आशियात हे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे.
UN report says condition of women in third world