वृत्तसंस्था
दोहा : अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीने कब्जा केल्यानंतर परागंदा झालेले अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांना अखेर संयुक्त अरब अमिरातीने राजकीय आश्रय दिला आहे. UAE Ministry of Foreign Affairs and International Cooperation confirms that the UAE has welcomed President Ashraf Ghani and his family into the country on humanitarian grounds
संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारने यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी केले असून त्यांनी मानवी आधारावर अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबियांना आश्रय दिल्याचे स्पष्ट केले आहे. तालिबानी राजवटीत संदर्भात अद्याप कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अशरफ घनी हे देश सोडून परागंदा झाले. सुरुवातीला ते तजिकिस्तान मध्ये गेल्याच्या बातम्या आल्या. परंतु नंतर त्यांचा ठावठिकाणा कोणाला समजला नाही. देशाला तालिबान्यांच्या कब्जात सोडून अध्यक्ष घनी परागंदा झाल्यावरून त्यांच्यावर अफगाणिस्तानातून तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही टीकेची झोड उठली.
परंतु, आता संयुक्त अरब अमिरातीने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मानवी आधारावर राजकीय आश्रय दिल्याचे जाहीर झाल्या केल्याने त्यांचा नेमका ठावठिकाणा आता अधिकृतरित्या स्पष्ट झाला आहे. अशरफ घनी यांना संयुक्त अरब अमीरातीत राहून कोणत्या राजकीय हालचाली करता येतील का नाही याविषयी अद्याप स्पष्टता नाही.
UAE Ministry of Foreign Affairs and International Cooperation confirms that the UAE has welcomed President Ashraf Ghani and his family into the country on humanitarian grounds
महत्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या
- शबरीमला मंदिरात वडिलांसोबत दर्शनास जाण्याची अल्पवयीन मुलीला परवानगी
- मराठवाड्यात सर्वदूर बरसल्या श्रावणधारा, पावसामुळे पिकांना मिळाले जीवदान
- महाराष्ट्र ठरले एक कोटी जनतेला दोन्ही डोस देणारे देशातील पहिले राज्य
- राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल