विशेष प्रतिनिधी
नगेरुल्मूड – पश्चिम प्रशांत महासागरातील पलाऊ द्विपसमुहाच्या सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे उद्दिष्ट ९९ टक्के साध्य केले आहे. ५०० बेटांचा समूह असलेल्या या देशाची लोकसंख्या अवघी १८ हजार आहे.Three islands top in vaccination
त्यात १२ वर्षांवरील १६ हजार १५२ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. पलाऊ, फिजी आणि कुक बेटे अशा अनेक देशांतील लसीकरणाचे प्रमाण उच्चांकी आहे.रेड क्रॉस महासंघाने ही माहिती दिली आहे. या देशातील लसीकरणाचा वेग अप्रतिम आहे,
अशा शब्दांत या कामगिरीची प्रशंसा करण्यात आली. पलाऊमध्ये सरकारने लसीकरणासाठी योजनाबद्ध वेळापत्रक आखले आहे. कुक बेटांची लोकसंख्या १७ हजार असून डोससाठी पात्र असलेल्या ९६ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. फिजीची लोकसंख्या आठ लाख ९६ हजार आहे. तेथे पहिला डोस मिळालेल्यांचे प्रमाण ९६ टक्के आहे.
Three islands top in vaccination
महत्त्वाच्या बातम्या
- थोडी तरी लाज शिल्लक असेल तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अतुल भातखळकर यांची मागणी
- सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश : दिल्ली उच्च न्यायालय गुप्तचर-सुरक्षा संस्थांना आरटीआय अंतर्गत आणण्याचा निर्णय घेईल
- Csk चा शिलेदार ऋतुराज गायकवाडचे पुण्यातील घरी धूमधडाक्यात आगमन
- सरदार उधम सिंग मुव्ही रिव्ह्यू
- Target Killing : काश्मिरात दहशतवाद्यांचे पुन्हा भ्याड कृत्य, कुलगाममध्ये तीन परप्रांतीयांवर गोळीबार, दोन जणांचा मृत्यू