विशेष प्रतिनिधी
दिल्ली : ट्विटरवर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ न्यूयॉर्क मधील इंडियन अॅम्बेसी मधला आहे. इंडियन अॅम्बेसीमध्ये व्हिसा डिपार्टमेंटमध्ये काम करणारे विजय शंकर प्रसाद एका इंडियन कपलवर या व्हिडिओमध्ये ओरडताना दिसत आहेत. तर काय आहे या व्हायरल व्हिडिओ मागची कहानी?
The woman, who was returning to India for her father’s funeral, was harassed at the Indian Embassy in New York. What is the truth behind the viral video?
टिना ही अमेरिकेमध्ये आपल्या नवऱ्यासोबत राहते. तिच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. आपल्या मृत वडिलांचे शेवटचे क्रियाकर्म करावे म्हणून भारतात येण्यासाठी टीना व्हिसा डिपार्टमेंटमध्ये गेली होती. तिने सर्व डॉक्युमेंट्स दिले, सर्व पेपर वर्क पूर्ण केले होते. तरी देखील तेथे उपस्थित असणारे व्हिसा ऑफिसर विजय शंकर प्रसाद यांनी तिला कोणतेही सहकार्य केले नाही. तुम्ही अमेरिकेत राहता आता तुम्ही भारतीय नाही असे देखील त्यांनी म्हटले असे टिनाचे म्हणणे आहे. आणि ही घटना तिच्या वडिलांच्या निधनाच्या काही तासांनंतरच घडलेली आहे. टीना भारतामध्ये आली. तिने आपल्या वडिलांच्या क्रियाकर्म देखील केले. पण झालेल्या घटनेचा धक्का बसला होता. म्हणून तिने हे सर्व ट्विटरवर इंडियन अॅम्बेसी न्यूयॉर्कला करून टॅग करून मेन्शन केले आहे.
Videos of Dolphins off Mumbai Coast went Viral amid Coronavirus scare…
बऱ्याच लोकांनी या ट्वीटला रीट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एखाद्याच्या दु:खी काळात असे वागणे चुकीचे आहे, आपल्या असलेल्या अधिकारांचा दुरुपयोग करू नये, तुम्ही भारताला याच पध्दतीने अमेरिकेमध्ये रिप्रेझेंट करता का, अशा बऱयाच कमेंट्स सध्या ट्विटरवर येताना दिसून येत आहेत.
The woman, who was returning to India for her father’s funeral, was harassed at the Indian Embassy in New York. What is the truth behind the viral video?
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! महाराष्ट्रातील ५० हजार गावात आरोग्य यंत्रणाच नाही !औरंगाबाद खंडपीठात बबनराव लोणीकरांनी केली याचिका दाखल
- ममता बॅनर्जी – भूपेंद्र पटेल; एकीकडे राजकीय गाजावाजा; दुसरीकडे आर्थिक गुंतवणुकीला हवा!!
- राज्यावर घोंगवतेय ‘जोवाड’ चक्रिवादळ; अवकाळीमुळं पिकांचंही मोठं नुकसान
- कोरोना संसर्गाची माहिती लपविल्याबद्दल ॲमेझॉन कंपनीला पाच लाख डॉलरचा दंड
- म्यानमारमधील लोकांची अवस्था बिकट, संयुक्त राष्ट्रांकडून मदतीचे आवाहन
- अफवा, दिशाभूल करणारी माहिती रोखण्यासाठी ‘ट्विटर’ने उचलले नवे पाउल, वर लवकरच दिसणार नवी रचना असलेले लेबल
- २०१४ नंतर भारत बनला अमेरिकेचा गुलाम – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर यांचा हल्लाबोल