• Download App
    अमेरिकेचा परराष्ट्र विभाग शोध घेतोय एका व्हिस्कीच्या बाटलीचा, किंमत आहे तब्बल साडेचार लाख रुपये|The US State Department is searching for a bottle of whiskey, which costs around Rs 4.5 lakh

    अमेरिकेचा परराष्ट्र विभाग शोध घेतोय एका व्हिस्कीच्या बाटलीचा, किंमत आहे तब्बल साडेचार लाख रुपये

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : व्हिस्कीच्या एका बाटलीची किंमत साडेचार लाख रुपये! खरोखरच ही बाटली अद्भूतच असणार. पण त्यापेक्षाही अद्भूत आहे की अमेरिकेचे सरकार या व्हिस्कीच्या बाटलीचा शोध घेत आहे.अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांना जपान सरकारने दिलेली 5,800 डॉलरची व्हिस्कीची बाटली कोठे आहे हे अमेरिकन परराष्ट्र विभाग शोधत आहे, असे अमेरिकेच्या सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.The US State Department is searching for a bottle of whiskey, which costs around Rs 4.5 lakh

    परराष्ट्र विभागाकडून अमेरिकन फेडरल कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंची यादी देण्याच्या 22 जुलै रोजीच्या स्टेट डिपार्टमेंट ऑफ चीफ आॅफ प्रोटोकॉलच्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, 24 जून 2019 रोजी जपान सरकारने पॉम्पीओ यांना व्हिस्कीची बाटली भेट दिली होती. मात्र, ही बाटली मिळत नसल्याने ती गायब झाल्याचे यादीमध्ये म्हटले आहे.



    न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अमेरिकन अधिकाºयांना ३९० डॉलर्सपेक्षा पेक्षा कमी किंमतीच्या भेटवस्तू स्वत:कडे ठेवण्याची परवानगी आहे. त्यापेक्षा मौल्यवान भेटवस्तू स्वत:कडे ठेवायची असेल तर त्याचे पैसे भरावे लागात.

    अमेरिकन परराष्ट्र विभाग ही बाटली शोधत आहे मात्र पॉम्पीओ यांना ही बाटली मिळाल्याचेच आठवत नाही. पोम्पिओ यांचे वकील विल्यम बर्क म्हणाले:, पॉम्पीओ यांना व्हिस्कीची बाटली भेट म्हणून मिळाल्याचेच आठवत नाही. त्यामुळे ही कोठे आहे हे माहित असण्याचा प्रश्नच नाही.

    न्यूयॉर्क टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अमेरिकन सरकारला या बाटलीसाठीचे पैसेही मिळाले नाहीत. त्यामुळे परराष्ट्र विभागाने महानिरीक्षकांना या बाटलीचा शोध घेण्यास सांगितले आहे.

    पोम्पीओ हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात परराष्ट्र मंत्री होते. त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे की, करदात्यांच्या पैशातून साधनांचा वापर करून पोम्पीओयांनी नैतिक नियमांचे उल्लंघन केले आहे. पॉम्पीओ यांनी आपल्यावरील सर्व आरोप हे राजकीय हेतून प्रेरित होऊन केल्याचे म्हटले आहे.

    The US State Department is searching for a bottle of whiskey, which costs around Rs 4.5 lakh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या