• Download App
    महिला अभिनेत्री असलेल्या टिव्ही मालिका बंद करण्याचे तालिबानने फर्मान सोडले | The Taliban has ordered the closure of a TV series featuring female actresses

    महिला अभिनेत्री असलेल्या टिव्ही मालिका बंद करण्याचे तालिबानने फर्मान सोडले

    विशेष प्रतिनिधी

    तालिबान: तालीबानी प्रशासनाने रविवारी अफगाणिस्तानमध्ये ‘इस्लामिक मार्गदर्शक तत्वे’ जाहीर केलेली आहेत. या तत्वानुसार टेलीवीजनवरील मालिकांमध्ये अथवा डेली सोपमध्ये महिला अभिनेत्रींना काम करता येणार नाही. तसेच महिला पत्रकाराना टीव्हीवर वृत्त देताना हिजाब परीधान करावा लागेल असे निर्देश प्रसारमाध्यमांना दिले आहेत. तालिबानने असे नवीन नियम महिलांसाठी लागू केले आहेत.

    The Taliban has ordered the closure of a TV series featuring female actresses

    तालीबानचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तान मंत्रालयाने सदगुणाचा प्रचार व दुर्गुणांचा विरोध करणेसाठी हा आदेश जारी केला आहे. तसेच चित्रपट व मालिकामध्ये प्रेषित मुहम्मद व इतर आदरणीय व्यक्ती दाखवले असतील तर असे कार्यक्रम प्रसारित करण्यास चॅनेलना मनाई केली आहे.


    Taliban On India: तालिबानी परराष्ट्र मंत्री म्हणाले- अफगाणिस्तानला भारतासह कोणत्याही देशाशी संघर्ष नको!, इस्लामिक स्टेटचा धोका


    एएफपी वृत्तसंस्थेला मंत्रालयाचे प्रवक्ते हकीफ मोहाजीर यांनी सांगितले की, “हेे नियम नसून मार्गदर्शक तत्वे आहेत.” रविवारी सोशल माध्यमांवर नवीन मार्गदर्शक तत्वे पोस्ट केली आहेत. आपल्या नवीन राजवटीत महिलांना स्थान दिले जाईल असा दावा तालिबान करत असते. तरीही महिलांसाठी निर्बंध घातले आहेत. अफगाण महिला पत्रकार वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी आंदोलन करत आहेत. या महिला पत्रकारांचे शोषण झाल्याच्या तसेच हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

    The Taliban has ordered the closure of a TV series featuring female actresses

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या