विशेष प्रतिनिधी
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान कोर्टात हजर होण्यासाठी जात असताना पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना अटक केली. इम्रान खान यांना झालेल्या अटकेवरून इस्लामाबाद हायकोर्टानेही नाराजी व्यक्त केली होती. कोर्टाने पोलिस प्रमुखांना यासंबंधित जाबही विचारल्याचे वृत्त आहे. The Focus Explainer: Why was Imran Khan arrested? Know what is Al-Qadir Trust Case? Only Pakistan was on fire due to the arrest
आजच्या द फोकस एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया की, माजी पंतप्रधान इम्रान खान यांना का अटक करण्यात आली?
कशा पद्धतीने झाली अटक?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांना अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) ने इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या (IHC) बाहेरून अटक केली आहे. इम्रान त्यांच्यावर दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये जामीन मागण्यासाठी गेले होते.
काय आहे अल-कादिर ट्रस्ट प्रकरण?
हा विद्यापीठाचा विषय आहे. इम्रान खान, त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि त्यांचे जवळचे सहकारी झुल्फिकार बुखारी आणि बाबर अवान यांचा अल-कादिर विद्यापीठ प्रकल्प ट्रस्टमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. इम्रान खान, बुशरा बीबी, झुल्फिकार बुखारी आणि अवान यांनी झेलमच्या सोहावा तहसीलमध्ये ‘गुणवत्ता शिक्षणासाठी’ ‘अल-कादिर विद्यापीठ’ स्थापन करण्यासाठी ट्रस्टची स्थापना केल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.
कोट्यवधी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे दिल्याचा आरोप
वृत्तानुसार, इम्रान खान यांच्यावर पंतप्रधान असताना या विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे दिल्याचा आरोप आहे. पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्वांपैकी एक असलेल्या मलिक रियाझ यांनी या प्रकरणाचा खुलासा करताना आरोप केला होता की, इम्रान आणि त्यांच्या पत्नीने अटकेचा धाक दाखवून कोट्यवधी रुपयांची जमीन आपल्या नावावर केली आहे. इम्रान आणि त्यांची पत्नी बुशरा हे अल-कादिर विद्यापीठाचे एकमेव विश्वस्त आहेत. वृत्तानुसार, सुमारे 90 कोटींच्या या विद्यापीठात 6 वर्षांत केवळ 32 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.
190 मिलियन पौंडांच्या गैरव्यवहाराचा आरोप
इम्रान खान यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. इम्रान खान, त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि इतर पीटीआय नेतेदेखील पीटीआय सरकार आणि प्रॉपर्टी टायकून यांच्यातील कराराशी संबंधित NAB चौकशीला सामोरे जात आहेत. ज्यामुळे राष्ट्रीय तिजोरीला 190 मिलियन डॉलरचे झाले आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांवर ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीने (NCA) सरकारला पाठवलेले 50 अब्ज रुपये – त्यावेळी 190 मिलियन पौंडांची हेराफेरी केल्याचा आरोप आहे.
इम्रान खान म्हणाले- मी तुरुंगात जाण्यास तयार
इम्रान खान यांना अटक करण्यापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये इम्रान म्हणत आहे की, ‘माझ्याविरुद्ध कोणताही खटला नाही. त्यांना मला तुरुंगात टाकायचे आहे. यासाठी मी तयार आहे.
इम्रान यांचा आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप
नुकतेच इम्रान खान यांनी आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानी लष्कराने हे आरोप फेटाळून लावले. यानंतर मंगळवारी इम्रान यांनी एक व्हिडिओ जारी करून पुन्हा तोच आरोप केला आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर सुमारे चार तासांनी इम्रान खान यांना न्यायालयाच्या आवारातून अटक करण्यात आली.
इम्रान खान यांच्या अटकेनंतर गृहमंत्री काय म्हणाले?
इम्रान खान यांच्या अटकेनंतर गृहमंत्री राणा सनाउल्ला म्हणाले की- इम्रान आणि बुशरा बीबी यांना गेल्या वर्षी मे महिन्यापासून नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनएबी) कडून स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी नोटिसा बजावल्या जात होत्या. ते तपासात सहभागी होत नव्हते. हा 50 ते 60 अब्ज रुपयांचा घोटाळा आहे. इस्लामाबाद ते रावळपिंडी हे अंतर सुमारे 23 किलोमीटर आहे. तेथे त्यांना विशेष सुरक्षेत ठेवण्यात आले आहे. त्यांना बुधवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
आर्मी कमांडरच्या घरावर हल्ला
इम्रान खान यांच्या अटकेनंतर लाहोरमधील लष्करी कमांडरच्या घरावर खान यांच्या पक्षाच्या पीटीआय कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू फोडून काही ऐवज लंपास केला. याशिवाय, पेशावर आणि बन्नू शहरात पोलिस आणि पीटीआय कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे.
The Focus Explainer: Why was Imran Khan arrested? Know what is Al-Qadir Trust Case? Only Pakistan was on fire due to the arrest
महत्वाच्या बातम्या
- तीस्ता सेटलवाडविरोधात आरोपपत्राची प्रक्रिया पूर्ण, 22 मे रोजी होणार सुनावणी, मोदी आणि गुजरात सरकारच्या मानहानीचा खटला
- केसीआर सरकारला उखडून फेका, तेलंगणात कडाडल्या प्रियांका गांधी, तरुणांना कंपन्यांत 75% आरक्षणाचे वचन, 4000 रुपये बेरोजगार भत्ताही
- हायकोर्टाने म्हटले- अक्कलदाढ हा काही वयाचा भक्कम पुरावा नाही, ती नसल्याने मुलगी अल्पवयीन सिद्ध होत नाही; रेपच्या आरोपीची निर्दोष मुक्तता
- मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण, मंत्रालयांकडून मागवला अहवाल, निश्चित फॉरमॅट विचारले- आधी काय परिस्थिती होती आणि आता काय सुधारणा झाली!!