विशेष प्रतिनिधी
बीजिंग : चीनच्या नव्या अवकाश स्थानकाबाहेर चिनी अंतराळवीरांनी पहिला स्पेस वॉक केला. अवकाश स्थानकाबाहेर आलेल्या या अंतराळवीरांनी १५ मीटर लांबीचा रोबोटिक हाताचा वापर करून विविध उपकरणे कार्यान्वित केली.The first space walk of Chinese astronauts outside the new space station
हे अवकाशस्थानक अद्याप निर्मिती प्रक्रियेत आहे. या स्पेस वॉकचे चीनमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात आले. लिऊ बोमिंग आणि तांग हाँगबो हे दोघे अंतराळवीर सुमारे सात तास अवकाश स्थानकाबाहेर होते.
निई हायशेंग हा तिसरा अवकाशवीर स्थानकाच्या आतून समन्वय साधत होता.लिऊ याने स्वत:ला रोबोटिक हाताशी जोडले आणि रिमोटच्या साह्याने हाताची हालचाल करत उपकरणे बसवून ती कार्यान्वित केली. हे तिघे अवकाशवीर १७ जूनला अवकाशस्थानकात आले असून ते तीन महिने येथे थांबणार आहेत.
The first space walk of Chinese astronauts outside the new space station
महत्त्वाच्या बातम्या