• Download App
    डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला, 4 एप्रिलला शरण येणार, म्हणाले- निवडणूक तर लढणारच!|The criminal case against Donald Trump will be surrendered on April 4, he said - he will fight the election!

    डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला, 4 एप्रिलला शरण येणार, म्हणाले- निवडणूक तर लढणारच!

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला दाखल होणार आहे. न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन ग्रँड ज्युरीने गुरुवारी त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्याचा निर्णय घेतला. 2016च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी, एका पॉर्न स्टारशी अफेअर आणि तिला गप्प राहण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी ट्रम्प यांच्यावर हा खटला चालणार आहे. गुन्हेगारी आरोपांना सामोरे जाणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष असतील. ते मंगळवारी म्हणजेच 4 एप्रिल रोजी आत्मसमर्पण करू शकतात.The criminal case against Donald Trump will be surrendered on April 4, he said – he will fight the election!

    याबाबत माजी राष्ट्रपती म्हणाले – माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. न्यूयॉर्कमध्ये त्याची न्याय्य चाचणी होऊ शकत नाही. अमेरिकेतील जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळेच माझ्यावर हे आरोप होत आहेत. जो बायडेन यांना हे जड जाईल. कट्टरपंथी आणि डावे डेमोक्रॅट्स काय करत आहेत हे अमेरिकेतील लोकांना समजले आहे. सर्व जनता हे पाहत आहे.



    ट्रम्प म्हणाले- रिपब्लिकन्सचा मला फसवण्याचा डाव

    या निर्णयाची घोषणा केल्यानंतर काही वेळातच ट्रम्प म्हणाले की, मला अडकवण्यासाठी डेमोक्रॅट्सनी यापूर्वी अनेकदा खोटे बोलले आणि फसवणूक केली, परंतु यावेळी त्यांनी एका निर्दोषावर खोटे आरोप केले. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांना कायदेशीर लढाईसाठी पैसे देण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारातून आतापर्यंत सुमारे 2 मिलियन डॉलर्स (रु. 16 कोटी 42 लाख) उभे केले आहेत. यापूर्वी, 18 मार्च रोजी ट्रम्प यांनी 4 दिवसांनी अटक होण्याची चुकीची भविष्यवाणी केली होती.

    ट्रम्प निवडणूक लढवण्यावर ठाम

    ट्रम्प 2024 मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यांनी गेल्या वर्षी निवडणुकीत उभे राहण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी टेक्सासमध्ये रॅलीही घेतली होती. या खटल्याच्या घोषणेनंतर त्यांनी 2024च्या निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, गुन्हेगारी प्रकरणामुळे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.

    ट्रम्प तुरुंगात जाण्याची शक्यता कमी

    मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नी अल्विन ब्रॅग यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या वकिलांशी त्यांच्या वतीने बोलणे झाले आहे आणि येत्या मंगळवारपर्यंत ते आत्मसमर्पण करू शकतात. त्याचवेळी ट्रम्प यांचे वकील जोसेफ टॅकोपिना आणि सुझान नेचेल्स यांनी ते पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे सांगितले. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, ट्रम्प यांच्या आत्मसमर्पणानंतर न्यायाधीश त्यांच्यावरील आरोप उघड करतील. यानंतर माजी राष्ट्रपतींना फिंगरप्रिंटिंग आणि उर्वरित कायदेशीर प्रक्रियेसाठी मॅनहॅटनला जावे लागेल. मात्र, अशा कलमांतर्गत त्यांची तुरुंगात जाण्याची शक्यता कमी आहे.

    The criminal case against Donald Trump will be surrendered on April 4, he said – he will fight the election!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या