विशेष प्रतिनिधी
वाशिंग्टन : अमेरिकेच्या कमकुवत नेतृत्वाचे परिणाम नेहमीच जगाला भोगावे लागतात असा हल्लाबोल अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडामधील ओरलँडो येथील भाषणादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यावर निशाणा साधला. ट्रम्प म्हणाले,The consequences of America’s weak leadership are always felt by the world, Donald Trump’s Attack on Joe Biden: Donald Trump
अमेरिकेच्या कमकुवत नेतृत्वाचे परिणाम नेहमीच जगाला भोगावे लागतात. जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष मजबूत असतात तेव्हा जग नेहमीच सुरक्षित असते. अमेरिकेला मजबूत असणे आवश्यक आहे. नेतृत्व जेव्हा वाईट, कमकुवत किंवा असक्षम असते तेव्हा काय परिणाम होतात हे तुम्हीच पहताय.
रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु आहे. रशियाचे सैन्य युक्रेनवर हल्ला करत असताना युक्रेन सर्वस्वी बचावाच्या प्रयत्नात आहे. यावर बोलताना ट्रंप म्हणाले, रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला चुकीचा आहे. युक्रेनच्या लोकांबद्दल मला सहानुभूती आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचेही कौतुक करत त्यांना एक धाडसी आणि निडर नेता म्हटले आहे.
The consequences of America’s weak leadership are always felt by the world, Donald Trump’s Attack on Joe Biden: Donald Trump
महत्त्वाच्या बातम्या
- शर्मीला ठाकरे म्हणतात, १५ वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी कानाखाली वाजवली म्हणून आज सर्वत्र मराठीचा वापर
- गाढ झोपून हा युवक मिळवितो लाखो रुपये, यू ट्यूबची कमाल
- Russia Ukraine War : रशिया यूक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार? राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी यंत्रणेला केलं अलर्ट
- Kili Paul : किली पॉल-नीमा वर पंतप्रधान मोदी देखील फिदा ! त्यांच्या प्रतिभेचा आदर करत ‘मन की बात’मध्ये उल्लेख… म्हणाले भारतीय संगीताची जादू…