• Download App
    बिटकॉइनद्वारे कार खरेदीला एलॉन मस्क यांनीच लावला करकचून ब्रेक|Tesla will not sell car in bitcoin

    बिटकॉइनद्वारे कार खरेदीला एलॉन मस्क यांनीच लावला करकचून ब्रेक

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क : जगातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांनी बिटकॉइनच्या माध्यमातून टेस्ला कार खरेदी करण्याच्या योजनेला ब्रेक लावला आहे. मस्क यांच्या या भूमिकेमुळे बिटकॉइनच्या किमतींमध्ये मोठी घसरण होत आहे.Tesla will not sell car in bitcoin

    टेस्लाने बिटकॉइनचे व्यवहार रद्द केले असले तरीसुद्धा कंपनी अन्य क्रिप्टोकरन्सी वापराची शक्यता पडताळून पाहत आहे. प्रत्येक व्यवहारामागे एक टक्क्यांपेक्षाही कमी ऊर्जा खर्च होईल असा चलन पर्याय कंपनीकडून शोधला जात आहे.



    पर्यावरणाच्या कारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे मस्क यांनी जाहीर केले आहे.संगणकाच्या माध्यमातून होणारे बिटकॉइन मायनिंग आणि देवाणघेवाणीच्या व्यवहारांमुळे मोठ्या प्रमाणावर जैव इंधन जाळले जाते.

    यामध्ये कोळशाचा समावेश होतो. हे सर्वांत वाईट उत्सर्जन असल्याचे मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. टेस्लाने या वर्षाच्या प्रारंभी १.५ अब्ज डॉलर एवढ्या बिटकॉइनची खरेदी केली होती.

    त्यातील १० टक्के बिटकॉइनची ही खुल्या बाजारात विक्री करण्यात आली होती. शिल्लक बिटकॉइनच्या किमती एवढी रक्कम टेस्लाच्या खात्यावर आजही जमा आहे.

    Tesla will not sell car in bitcoin

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump said : ट्रम्प म्हणाले- आम्ही भारत-पाक अणुयुद्ध रोखले; दोन्ही देशांना समजावले; दोघांनीही सहमती दर्शवली

    व्यापाराचे हत्यार वापरून अमेरिकेनेच भारत – पाकिस्तानचे अणुयुद्ध थांबविले, अन्यथा लाखो लोक मेले असते; मोदींच्या भाषणाआधी डोनाल्ड ट्रम्प यांचे निवेदन!!

    Russian President Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची युक्रेनला चर्चेची ऑफर; युरोपीय देशांच्या धमकीनंतर आला प्रस्ताव