• Download App
    गाझावरील हवाई हल्ल्यात लहान मुलांसह दहा पॅलेस्टिनी ठार |Ten people died in Istryali attack

    गाझावरील हवाई हल्ल्यात लहान मुलांसह दहा पॅलेस्टिनी ठार

    विशेष प्रतिनिधी

    गाझा सिटी : इस्राईल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्ष कायम असून शनिवारी सकाळी इस्रायली विमानांनी गाझा शहरावर केलेल्यान हवाई हल्ल्यात दहा पॅलेस्टिनींचा मारले गेले. यात मुख्यत्वे लहान मुलांचा समावेश आहे. Ten people died in Istryali attack

    जेरुसलेम येथे प्रथम सुरू झालेल्या हिंसाचाराचे हे लोण पूर्ण प्रांतात पसरले आहे. ज्यू व अरबांमध्ये ठिकठिकाणी संघर्ष सुरू असून दंगलही होत आहे. वेस्ट बँक येथे पॅलेस्टाईन नागरिकांनी काल निदर्शनेही केली. तेथे इस्राईलने ११ जणांना ठार केले होते.



    संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी इस्राईल आणि गाझामधील हा संघर्ष तातडीने थांबविण्याचे आवाहन केले आहे. हा संघर्ष थांबविला गेला नाही तर केवळ पॅलेस्टाईन आणि इस्राईलच नाही तर

    या देशांच्या आसपासच्या भागातही सुरक्षा मानवीय दृष्टिकोनातून भयानक संकट उत्पन्न होऊ शकते, ज्यामुळे कट्टरतावादाला आणखी प्रोत्साहन मिळेल, असा इशारा त्यांनी दिला.

    या संघर्ष समाप्त करण्यासाठी ‘यूएन’ मध्यस्ती करण्यास सक्रिय असून अमेरिका, युरोपीय समुदाय आणि रशियाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्याचे आवाहन गुटेरस यांनी केले.

    Ten people died in Istryali attack

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या