युद्धग्रस्त देशात नवीन सरकार स्थापन करण्यास तयार असलेल्या तालिबानने सहशिक्षणावर बंदीची घोषणा केली आहे. महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना एकत्र अभ्यास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.Taliban’s Fatva: Not the permission of student and students study
वृत्तसंस्था
काबूल : महिलांच्या अधिकारांचा आदर केल्याचा दावा करणाऱ्या तालिबान्यांची फसवणूक पुन्हा जगासमोर आली आहे. युद्धग्रस्त देशात नवीन सरकार स्थापन करण्यास तयार असलेल्या तालिबानने सहशिक्षणावर बंदीची घोषणा केली आहे. महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना एकत्र अभ्यास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
तसेच पुरुष शिक्षकांना मुलींना शिकवू दिले जाणार नाही असा फतवा काढला. शेख अब्दुल बाकी हक्कानी यांना काळजीवाहू उच्च शिक्षण मंत्री बनवल्यानंतर काही दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला.
तसेच पुरुष शिक्षकांना मुलींना शिकवू दिले जाणार नाही असा फतवा काढला. शेख अब्दुल बाकी हक्कानी यांना काळजीवाहू उच्च शिक्षण मंत्री बनवल्यानंतर काही दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला.
खामा प्रेसच्या अहवालानुसार, तालिबानच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानच्या पश्चिम हेरात प्रांतात आदेश दिला की विद्यापीठांमध्ये मुली मुलांसोबत एकाच वर्गात शिकणार नाहीत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सहशिक्षण चालू ठेवण्याचे कोणतेही औचित्य नाही आणि ही प्रणाली बंद केली पाहिजे.नवनियुक्त कार्यवाह शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की अध्यापन उपक्रम शरिया कायद्यानुसार असतील.
हक्कानी म्हणाले की, मुला -मुलींना विद्यापीठांमध्ये एकत्र अभ्यास करण्याची परवानगी दिली जाणार नाही, उलट ते शरीयतनुसार स्वतंत्र वर्गात बसतील. खाजगी आणि सरकारी विद्यापीठांसोबत झालेल्या बैठकीनंतर हक्कानी यांनी ही घोषणा केली.
Taliban’s Fatva: Not the permission of student and students study
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाच्या मार्गावर पाऊल, लातूर जिल्ह्यातील दुर्गम नागतीर्थवाडी मोफत वाय-फाय मिळालेले पहिले गाव
- प्राप्तिकर विवरणपत्रासह विविध अर्ज भरण्याची मुदत महिन्याने वाढविली
- अमेरिकेत कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट, दिवसाला एक लाखापेक्षा जास्त रुग्ण
- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बांधावर जाईनात, शेतकऱ्यां ना भेटेनात, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून टीका