• Download App
    अमेरिकेचे ड्रोन हल्ले म्हणजे मनमानी, तालिबानने धारण केला आक्रमक पवित्रा Taliban targets USA on drone attack

    अमेरिकेचे ड्रोन हल्ले म्हणजे मनमानी, तालिबानने धारण केला आक्रमक पवित्रा

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – अमेरिका आणि नाटो देशांचे सैन्य परतण्याची मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी तालिबानने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संशयित आत्मघाती हल्लेखोरांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने अमेरिका करीत असलेले ड्रोन हल्ले म्हणजे मनमानी होय असे तालिबानने ठणकावले आहे. ड्रोन हल्ल्यांपूर्वी आपल्याला कल्पना द्यायला हवी होती, असेही सांगण्यात आले. Taliban targets USA on drone attack

    अमेरिकी सैन्य परतण्याचा अंतिम टप्पा सुरु असताना आत्मघाती हल्लेखोर कारबाँबच्या मदतीने काबूल विमानतळावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. इसिस-के या इस्लामिक स्टेटच्या स्थानिक संघटनेची त्यांना चिथावणी असल्याचे पेंटॅगॉनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

    अमेरिकी लष्कराच्या मुख्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याच्या वृत्तानंतर चौकशी सुरु झाली आहेत. वाहने नष्ट झाल्यानंतर भरपूर प्रमाणात आणि ताकदवान स्फोटक साहित्यांचे स्फोट झाले. त्यामुळे ती वाहने स्फोटक साहित्यांनी खचाखच भरली होते हे स्पष्ट होते.

    दरम्यान तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्लाह मुजाहिद याने सीजीटीएन या चीनच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीला ही लेखी निवेदनाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. परदेशी भूमीवरील अमेरिकेची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावाही त्याने केला.

    मुजाहीदने म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये कोणताही संभाव्य धोका असेल तर तसे आम्हाला सांगायला हवे होते. मनमानी हल्ला करायला नको होता. त्यामुळे निरपराध नागरिक मारले गेले.

    Taliban targets USA on drone attack

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या