• Download App
    तालिबान नियम : हिजाब नसेल आणि पुरुष नातेवाईक सोबत नसतील तर अफगाणिस्तान मधील स्त्रियांना प्रवास करण्यास मनाई | Taliban rule: Women are not allowed to travel in Afghanistan without hijab and without male relatives

    तालिबान नियम : हिजाब नसेल आणि पुरुष नातेवाईक सोबत नसतील तर अफगाणिस्तान मधील स्त्रियांना प्रवास करण्यास मनाई

    विशेष प्रतिनिधी

    काबुल : 1990 च्या दशकात महिलांवर घातलेल्या निर्बंधांपेक्षा कमी निर्बंध लादले जातील असे नुकत्याच अफगाणिस्तानमध्ये प्रस्थापित तालिबान राजवटीने आश्वासन दिले होते. असे असताना देखील अनेक महिलांवर अनेक निर्बंध लादले जात आहेत.

    Taliban rule: Women are not allowed to travel in Afghanistan without hijab and without male relatives

    तालिबान प्रवक्ते सादिक अख्खी मुजाहिर यांनी रविवारी जाहीर केले आहे की, स्त्रियांना जर 72 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास करायचा असेल तर त्यांच्यासोबत त्यांच्या घरातील कोणीतरी पुरुषाने असणे आवश्यक आहे. जर कोणी पुरुष स्त्रीच्या सोबत नसेल आणि त्यांनी बुरखा घातला नसेल तर त्यांना प्रवासाची परवानगी देण्यात येऊ नये.


    Taliban On India: तालिबानी परराष्ट्र मंत्री म्हणाले- अफगाणिस्तानला भारतासह कोणत्याही देशाशी संघर्ष नको!, इस्लामिक स्टेटचा धोका


    नुकताच तालिबानी निर्णय दिला होता की, टीव्हीवर प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या मालिकांमध्ये जिथे स्त्रिया काम करतात. त्या सर्व मालिका बंद करण्यात याव्यात. या पाश्र्वभूमीवर त्यांनी आणखी एक नियम जारी केला आहे. यामध्ये महिला टीव्ही जर्नलिस्टयांनीही हिजाब घालणे अत्यावश्यक आहे.

    मुलींच्या शाळांबद्दल देखील अजूनही अफगाणिस्तान मध्ये परिस्थिती डगमगलेलीच आहे. शाळा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर देखील अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अजूनही अनेक मुली माध्यमिक शिक्षणापासून दूर आहेत. अफगाणिस्तामधील सामाजिक कार्यकर्त्यांनी याच्याविरुद्ध आवाज उठवण्यास चालू केले आहे.

    Taliban rule: Women are not allowed to travel in Afghanistan without hijab and without male relatives

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार