• Download App
    तालिबानने कंधार आणि हेरातमधील भारतीय दूतावासात कुलूप तोडून केला प्रवेश, कार्यालयांची घेतली झडती । Taliban Maneuvers First Told India Make Friends Then Break Business Relations Sabotage The Indian Embassy

    तालिबानने कंधार आणि हेरातमधील भारतीय दूतावासात कुलूप तोडून केला प्रवेश, कार्यालयांची घेतली झडती

    Taliban : अफगाणिस्तानात सत्ता मिळवताच तालिबान्यांनीही डावपेच आखायला सुरुवात केली आहे. चीन आणि पाकिस्तानकडून नेहमीच वापरली जाणारी ही चाल आता तालिबाने भारतासोबत वापरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तालिबानने काबूलवर कब्जा करताच भारताशी संपर्क साधला होता आणि संबंध न तोडण्याची ऑफर दिली होती. दरम्यान, सर्वात धक्कादायक बातमी समोर आली आहे की, बुधवारी कंधार आणि हेरातमध्ये बंद असलेल्या भारतीय वाणिज्य दूतावासांमध्ये तालिबानी अतिरेक्यांनी प्रवेश केला असून त्यांनी कार्यालयांची झडती घेतली आहे. Taliban Maneuvers First Told India Make Friends Then Break Business Relations Sabotage The Indian Embassy


    वृत्तसंस्था

    काबूल : अफगाणिस्तानात सत्ता मिळवताच तालिबान्यांनीही डावपेच आखायला सुरुवात केली आहे. चीन आणि पाकिस्तानकडून नेहमीच वापरली जाणारी ही चाल आता तालिबाने भारतासोबत वापरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तालिबानने काबूलवर कब्जा करताच भारताशी संपर्क साधला होता आणि संबंध न तोडण्याची ऑफर दिली होती. दरम्यान, सर्वात धक्कादायक बातमी समोर आली आहे की, बुधवारी कंधार आणि हेरातमध्ये बंद असलेल्या भारतीय वाणिज्य दूतावासांमध्ये तालिबानी अतिरेक्यांनी प्रवेश केला असून त्यांनी कार्यालयांची झडती घेतली आहे.

    बंद भारतीय दूतावासात तालिबानी घुसले

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तालिबानी दहशतवाद्यांनी बुधवारी कंधार आणि हेरात येथील बंद भारतीय दूतावासांमध्ये प्रवेश केला होता आणि तेथील कागदपत्रांची छाननीही केली होती. त्यानंतर त्यांनी दूतावासाबाहेर उभी केलेल्या कार त्यांच्यासोबत नेल्या. भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तालिबान त्याच्या आश्वासनाविरुद्ध वागत आहे. त्यांनी जगातील कोणालाही हानी पोहोचवणार नसल्याचे आश्वासन दिले होते. त्याच वेळी हेरातमध्येही तालिबानने वाणिज्य दूतावास संकुलात घुसून वाहने काढून घेतली. हक्कानी नेटवर्क कॅडर काबूलवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण ठेवत असताना मुल्ला उमरचा दिवंगत मुलगा आणि तालिबान लष्करी आयोगाचा प्रमुख मुल्ला याकूबच्या नेतृत्वाखालील तालिबानी गट पश्तूनची परंपरागत जागा असलेल्या कंधारमधून सत्ता आणि सरकार ताब्यात घेण्यााचा विचार करत आहे. मुल्ला बरादार 18 ऑगस्ट रोजी दोहाहून आल्यानंतर मुल्ला याकूबला भेटला आहे.

    तालिबान नेते शेर मोहम्मद अब्बास यांनी भारतीयांकडे जाऊन त्यांना भारतीय दूतावास बंद न करण्याची विनंती केली होती. त्यांना तालिबानकडून कोणताही धोका नसल्याचे ते म्हणाले होते. परंतु गुरुवारी तालिबानने अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध तोडले. आता तिथून काहीही आयात करता येत नाही आणि काहीही निर्यात करता येणार नाही.

    भारताला मिळाला गुप्तचर अहवाल

    मीडिया रिपोर्टनुसार, भारताकडे तालिबानची काही गुप्त माहिती होती. यानुसार भारताला माहिती मिळाली होती की, तालिबानचा कब्जा होताच लश्कर आणि हक्कानीचे दहशतवादी काबूलमध्ये प्रवेश करणार आहेत, यांच्यापासून भारतीय दूतावास अधिकाऱ्यांना जास्त धोका आहे. त्यामुळे त्वरित कारवाई करत भारताने लष्करी विमानाने आपल्या राजदूतांना परत बोलावले होते.

    Taliban Maneuvers First Told India Make Friends Then Break Business Relations Sabotage The Indian Embassy

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र