विशेष प्रतिनिधी
काबूल – ‘आम्हाला पुन्हा आमचे घड्याळ वीस वर्षे मागे न्यायचे नाही. सध्या जे आहे, त्याचाच आधार घेऊन तालिबानला पुढे जायचे आहे,’ असे सांगत तालिबान सरकारमधील उच्च शिक्षण मंत्री अब्दुल बाकी हक्कानी याने महिलांना शिक्षणाची परवानगी असल्याचे जाहीर केले.Taliban gave permission for girls education
अफगाणिस्तानात विद्यापीठांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या महिलांना त्यांचे शिक्षण पुढे सुरु ठेवता येईल, पदव्युत्तर शिक्षणही घेता येईल, असे स्पष्टीकरण तालिबान सरकारने दिले आहे. हक्कानी याने शिक्षणाबाबत नवीन धोरणे जाहीर केली.
तो म्हणाला तालिबानच्या आधीच्या सत्ताकाळात मुलींना आणि महिलांना शिक्षण घेण्यास बंदी होती. ‘विद्यापीठात महिलांना उच्च शिक्षणही घेता येईल. मात्र, त्यांना हिजाब घालणे सक्तीचे असेल. विद्यापीठांमध्ये शिकविल्या जाणाऱ्या विषयांचाही आढावा घेतला जाईल,’ असे त्याने स्पष्ट केले. तालिबानच्या आधीच्या सत्तेवेळी त्यांनी संगीत आणि कला शिक्षणावर बंदी घातली होती.
Taliban gave permission for girls education
महत्त्वाच्या बातम्या.
- तालिबानने दाखवला त्याच्या राजवटीचा ट्रेलर , मुली आणि महिलांवर कडक निर्बंध, अफगाण कलाकारही देश सोडून जात आहेत
- उध्दव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस, किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल
- सर्वोच्च न्यायालय : कर्मचारी नियोक्त्यांना त्यांच्या इच्छित ठिकाणी स्थानांतरित करण्यासाठी दबाव आणू शकत नाहीत
- ठाकरे सरकार महिलांबाबत असंवेदनशिल, दोन वर्षांपासून महिला आयोगाची स्थापना नाही, राष्ट्रीय महिला आयोगाचे ताशेरे