Taliban : अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या कब्जा वाढत असतानाच त्यांच्या क्रौर्याच्या नवनव्या घटना समोर येत आहेत. युद्धग्रस्त अफगाणच्या बाल्ख प्रांतात तालिबान्यांनी एका मुलीची केवळ टाइट कपडे घातले आणि तिच्यासोबत कोणताही पुरुष साथीदार नसल्याने हत्या केली आहे. रिपोर्ट्सनुसार, समर कांडियन गावात तालिबानी अतिरेक्यांनी या तरुणीची गोळ्या घालून हत्या केली. हे गाव तालिबानच्या ताब्यात आहे. बाल्खमधील पोलीस प्रवक्ते आदिल शाह आदिल यांनी म्हटले केले की, मृत मुलीचे नाव नाझनीन असून ती 21 वर्षांची होती. Taliban executed young woman for wearing tight clothes in Balkh Afghanistan
वृत्तसंस्था
काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या कब्जा वाढत असतानाच त्यांच्या क्रौर्याच्या नवनव्या घटना समोर येत आहेत. युद्धग्रस्त अफगाणच्या बाल्ख प्रांतात तालिबान्यांनी एका मुलीची केवळ टाइट कपडे घातले आणि तिच्यासोबत कोणताही पुरुष साथीदार नसल्याने हत्या केली आहे. रिपोर्ट्सनुसार, समर कांडियन गावात तालिबानी अतिरेक्यांनी या तरुणीची गोळ्या घालून हत्या केली. हे गाव तालिबानच्या ताब्यात आहे. बाल्खमधील पोलीस प्रवक्ते आदिल शाह आदिल यांनी म्हटले केले की, मृत मुलीचे नाव नाझनीन असून ती 21 वर्षांची होती.
तालिबानकडून महिला व मुलींचे अपहरण
तालिबानी दहशतवाद्यांनी मुलीने घरातून बाहेर पडल्यानंतरच तिच्यावर हल्ला केला. ही मुलगी बाल्खची राजधानी मजार-ए-शरीफला जात असताना तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, हल्ल्याच्या वेळी तिने बुरखा परिधान केला होता, यामुळे तिचा चेहरा आणि शरीर दोन्ही झाकलेले होते. दुसरीकडे, तालिबानने हा हल्ला नाकारला आहे. संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले की, ते या हल्ल्याचा तपास करत आहेत. खरे तर अफगाणिस्तानमध्ये तालिबान मुली आणि महिलांचे अपहरण करत आहे. नंतर त्यांच्या फौजेतील तरुणांशी त्यांचे जबरदस्तीने लग्न लावले जात आहे.
तालिबानने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पत्नी आणि विधवांची नावे देण्याचे आदेश दिले
‘द मेल’ने रविवारच्या आपल्या वृत्तात म्हटले की, जेव्हा जेव्हा एखादा कट्टरपंथी गट अफगाणिस्तानातील एक गाव, शहर किंवा जिल्हा व्यापत असतो तेव्हा तो स्थानिक मशिदीच्या लाऊडस्पीकरचा वापर करून स्थानिक सरकारी कर्मचारी आणि पोलिसांच्या बायका आणि विधवा यांचे नावे सोपवण्याचे फर्मान जारी करत आहे. स्थानिक रहिवासी आणि अधिकाऱ्यांनी वृत्तपत्राला सांगितले की, या गटाने शेकडो तरुणींना युद्धानंतरच्या कैद्यांना त्यांच्या लढाऊ लोकांशी लग्न करण्यासाठी गोळा केले होते. तालिबानच्या उदयाची भीती वाटणारी कुटुंबे तालिबानपासून संरक्षण करण्यासाठी महिला आणि मुलींना अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह इतर सुरक्षित भागात पाठवत आहेत.
Taliban executed young woman for wearing tight clothes in Balkh Afghanistan
महत्त्वाच्या बातम्या
- Zydus Cadila च्या कोरोना लसीला या आठवड्यात मिळू शकते आपत्कालीन वापराची मंजुरी, गेल्या महिन्यातच दिला होता डेटा
- Corona Vaccine Clinical Trial Data : लसीच्या क्लिनिकल चाचणीचा डेटा सार्वजनिक करण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस
- सरकारने रब्बी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून एमएसपीवर आतापर्यंतची सर्वात मोठी खरेदी केली : पंतप्रधान मोदी
- राहुल गांधींनंतर ट्विटरने आता काँग्रेसचे ‘INC TV’चे अकाउंट केले ब्लॉक, नियमांच्या उल्लंघनाचा दिला हवाला
- आमदार कपिल पाटील, डॉ. गणेश देवी यांचा राष्ट्र सेवा दलात मनमानी कारभार, पदाधिकाऱ्यांचा आरोप ; क्रांती दिनी पुरस्कार केले परत