• Download App
    महिलांच्या मोर्चावर तालिबान्यांकडून अश्रुधूर आणि पेपर स्प्रेचा मारा|Taliban attacks on women protesters

    महिलांच्या मोर्चावर तालिबान्यांकडून अश्रुधूर आणि पेपर स्प्रेचा मारा

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – अफगाणिस्तानात महिलांना काम करण्यासाठी तसेच शिकण्यासाठी पोषक वातावरण असेल असे आश्वासन तालिबानने दिले आहे. मात्र हे आश्वासन पाळण्याची कोणतीच शक्यता नसल्याचे सध्या तरी दिसत नाही. महिलांना काम करण्याच्या हक्कासाठी मोर्चा काढलेल्या महिलांना बळाचा वापर करून रोखण्यात आले.Taliban attacks on women protesters

    महिलांना अध्यक्षीय प्रासादाच्या दिशेने मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अश्रुधूर आणि पेपर स्प्रेचा वापर करण्यात आला. मोर्चा नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे बळाचा वापर करणे भाग पडल्याचा दावा तालिबानने केल्याचे वृत्त टोलो न्यूजने दिले आहे.



    राजधानी काबूल आणि हेरत येथे अनेक महिला वारंवार निदर्शने करीत आहेत. काम करू द्यावे याशिवाय सरकारमध्ये समावेश व्हावा अशीही त्यांची मागणी आहे. तालिबानने प्रशासनाचे स्वरूप येत्या काही दिवसांत जाहीर करू असे म्हटले आहे. महिला सरकारमध्ये असतील पण त्यांना मंत्रिपद दिले जाणार नाही हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.

    Taliban attacks on women protesters

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    China : चीनमध्ये मुलाला जन्म दिल्याबद्दल ₹1.30 लाख देणार सरकार; वन चाइल्ड पॉलिसीमुळे 7 वर्षांत जन्मदर निम्म्यावर

    US EU : अमेरिका युरोपियन युनियनवर 15% कर लादणार; प्रारंभिक व्यापार करार पूर्ण

    Donald Trump : ट्रम्प प्रथमच गाझातील उपासमारीवर म्हणाले- चित्र खूपच भयावह, इस्रायलला आता निर्णय घ्यावा लागेल