विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – देशातील काळ्या पैशासंबंधी स्विस बँकांमधील भारतीयांच्या खात्यांची तिसरी यादी स्वित्झर्लंड सरकारने केंद्र सरकारकडे सोपविली आहे. सुमारे ९६ देशांना ३३ लाख आर्थिक खात्यांची माहिती पुरविली असल्याचा दावा स्वित्झर्लंडने केला आहे.swiss govt. handover bank accounts list
स्वित्झर्लंडच्या सांघिक कर प्रशासनाने (एफटीए) माहितीच्या आदान-प्रदानाच्या जागतिक मानकांवर आधारित तेथील बँकेतील खात्यांची माहिती या वर्षी भारताला दिली आहे.
याआधी ऑक्टोबर २०२० मध्ये ‘एफटीए’ने ८६ देशांबरोबर ३१ लाख खात्यांची माहिती दिली होती. तर सप्टेंबर २०१९ मध्ये स्वित्झर्लंडने भारतासह ७५ देशांना माहिती पुरविली होती. ‘एफटीए’ने याबाबत सोमवारी सांगितले की, यंदा आणखी दहा देशांना माहितीचे देवाण-घेवाण केले आहे. यात अँटिग्वा आणि बर्ब्युडा, अझरबैझान, डॉमनिका, घाना, लेबनॉन, मकाऊ, पाकिस्तान, कतार, समोआ आणि वानुआतू या देशांचा समावेश आहे.
स्वित्झर्लंडमधील ‘एफटीए’ने ज्याे देशांना आर्थिक माहिती दिली आहे, त्या सर्व ९६ देशांची नावे व अन्य तपशील उघड केलेले नाहीत.
swiss govt. handover bank accounts list
महत्त्वाच्या बातम्या
- जिंदगी ना मिलेगी दोबारा सिनेमामुळे स्पेनच्या टुरिझम व्यवसायात झाली होती 32% नी वाढ ?
- दुर्गा सन्मान: द फोकस इंडियाच्या वतीने पहिला ‘दुर्गा सन्मान’ पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न ; प्रशांत दामलेंनी द फोकस इंडियाला शुभेच्छा देत केले कौतुक
- चोर समजून २६ वर्षीय तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक
- आईस्क्रीम खाणे आता महागणार!, १८ टक्के जीएसटी लागू