• Download App
    बिनबुडाच्या बातम्या देऊ नका, न्यूयॉर्क टाईम्सला केंद्राने खडसावले Stop baseless reporting, Center slams New York Times on Covid Deaths

    बिनबुडाच्या बातम्या देऊ नका, न्यूयॉर्क टाईम्सला केंद्राने खडसावले

    लोकसंख्येच्या बाबतीत भारत 132 कोटींचा, अमेरिका जेमतेम चाळीस कोटींची. एवढा प्रचंड फरक असूनही कोरोना महामारीला तोंड देताना बलाढ्य, श्रीमंत अमेरिकेची पळता भुई थोडी झाली. इकडे भारत मात्र अपुरी साधने, निधीची कमतरता असूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतूनही सावरतो आहे. भारतीयांचा याच दृढ संकल्पामुळे आणि लढाऊ वृत्तीमुळे पाश्चात्य प्रसारमाध्यमांच्या पोटात दुखू लागले आहे. याच पोटशुळातून ‘काट्याचा नायटा’ करणारी पत्रकारीता अमेरिकी प्रसारमाध्यमांनी चालवली आहे. बिनबुडाच्या बातम्या, अपुऱ्या व चुकीच्या माहितीच्या आधारे काढलेले निष्कर्ष या आधारे भारतातील कोरोना साथीचे चित्रण केले जात आहे. या प्रयत्नांना केंद्र सरकारने फटकारले आहे. Stop baseless reporting, Center slams New York Times on Covid Deaths


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : न्यूयॉर्क टाईम्स या अमेरिकी वृत्तपत्राने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या लेखात म्हटले की भारतातील कोरोना बळींची संख्या अधिकृत तीन लाखांच्या तिप्पट आहे. न्यूयॉर्क टाईम्सने काढलेल्या या अतिरंजित निष्कर्षाला कोणताही आधार नाही. त्यामुळेच केंद्र सरकारने न्यूयॉर्क टाईम्सच्या या लेखनाची निर्भत्सना ‘बिनबुडाची’ या एकाच शब्दात केली आहे. भारतातील कोरोना बळींची मोजदाद होत नाही, त्यांची नोंद होत नाही असा दावा न्यूयॉर्क टाईम्स (एनवायटी)ने केला होता.

    नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल म्हणाले, “एनवायटीच्या वार्तांकनाला कोणताही आधार नाही. केवळ मोडतोड केलेल्या अंदाजांवर आधारीत हे लेखन करण्यात आले आहे.” पॉल यांच्याकडेच भारताच्या कोविड कृती दलाची जबाबदारी आहे.

    एनवायटीने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या या लेखामध्ये म्हटले की, अँटीबॉडी चाचण्या किंवा देशपातळीवरील सिरो सर्वे लक्षात घेतला तर भारताने जाहीर केलेल्या कोरोना बळींच्या संख्येपेक्षा प्रत्यक्षातले कोरोना बळी तिप्पट आहेत. अगदी वाईटात वाईट स्थितीत भारतातीस कोरोना बळींची संख्या सुमारे 42 लाख असू शकते असाही अतिरंजीत दावा या लेखात करण्यात आला आहे. भारताने कोरोना बळींची अधिकृत संख्या पुढे आणलेली नाही, असा शेरा या लेखात मारण्यात आला आहे.



    डॉ. पॉल म्हणाले की पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कदाचित काही पटीने जास्त असू शकते. पण याचा अर्थ कोरोना बळींची संख्याही काही पटींनी जास्त आहे असा होत नाही. त्यांनी पुढे सांगितले, “कोरोना बळींची नोंद होण्यास काही ठिकाणी उशीर होत आहे. मात्र हे बळी दडवण्याचा राज्य किंवा केंद्र सरकारचा कोणताच हेतू नाही. हेच तिप्पट बळींची फुटपट्टी जर मी न्यूयॉर्क शहरासाठी वापरली तर त्या शहरातील कोरोना बळींची संख्या पन्नास हजार सांगावी लागेल.

    प्रत्यक्षात फक्त 16 हजार मृत्यू झाल्याचेच न्यूयॉर्क सांगते. त्यामुळे भारताबद्दलचे त्यांचे दावे निराधार आहेत.”
    “कोरोनाबाधितांमधील मृत्यूदर जेमतेम 0.05 टक्के आहे. त्यांनी 0.3 टक्के असल्याचे म्हटले आहे. असे का ? कशाच्या आधारे त्यांनी हा आकडा निश्चित केला? याला काहीच आधार नाही. पाच माणसं एकत्र येतात. एकमेकांना फोन करतात आणि आकड्यांची फेकमफाक करतात. याच पद्धतीने न्यूयॉर्क टाईम्सने आपला रिपोर्ट तयार केला आहे,” अशा कडक शब्दात पॉल यांनी एनवायटीवर ताशेरे ओढले. बळींची नोंद घेण्यासाठी मजबूत यंत्रणा काम करत आहे. या पार्श्वभूमीवर या “तथाकथीत प्रतिष्ठित वृत्तपत्रा”ने हा लेख प्रसिद्ध करायला नको होता, असेही पॉल यांनी सुनावले.

    आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोना रुग्णसंख्येमध्ये गेल्या वीस दिवसात सातत्याने घट होत आहे. देशातल्या 24 राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असलेली दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले, “कोरोनाची दुसरी लाट ओसरी लागली आहे. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बऱ्यापैकी शिथिलता आणल्यानंतरही ही ओहोटी टिकून राहील असा आम्हाला विश्वास आहे.” दरम्यान, गुरुवारी देशात 2.11 लाख नव्या कोरोनारुग्णांची नोंद झाली. देशभरातल्या कोरोनाबळींची संख्या गुरुवारी 3 हजार 847 होती. आजवरच्या एकूण कोरोनाबाधितांची देशातली संख्या 2.73 कोटी तर एकूण बळींची संख्या 2.15 लाख आहे.

    Stop baseless reporting, Center slams New York Times on Covid Deaths

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार