वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : गत महिन्यात अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन जोस येथील उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला गेला होता. हा पुतळा आता प्रसिद्ध जंकयार्डमध्ये सापडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जिथे सापडला ते ठिकाण अवैध कामांसाठी ओळखले जाते, अशी माहिती एका मीडिया रिपोर्टमध्ये देण्यात आली होती. हा पुतळा उत्तर अमेरिकेतील छत्रपती शिवरायांचा एकमेव पुतळा होता.Statue of Chhatrapati Shivaji Maharaj stolen in America found in junkyard, search for thieves is on
सन 1999 मध्ये हा पुतळा पुणे शहरातून सॅन जोसला भेट म्हणून देण्यात आला होता. मर्क्युरी न्यूज वृत्तपत्राने 31 जानेवारी रोजी ग्वाडालुपे रिव्हर पार्कमधून पुतळा चोरीला गेल्याचे वृत्त दिले होते. या मूर्तीचे नुकसान झाले होते.
अद्याप कुणालाही अटक नाही
सुमारे 200 किलो वजनाचा हा पुतळा 9 फेब्रुवारी रोजी एका जंकयार्डमध्ये आढळला. याप्रकरणी पोलिसांनी जंकयार्डच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. वृत्तानुसार, जंकयार्डच्या कर्मचाऱ्यांनी अधिक माहिती न देता सांगितले की, दोन पुरुष आणि एक महिला 29 जानेवारी रोजी पुतळा देण्यासाठी येथे आले होते.
पुतळ्याचे पाय कट केले
सॅन जोस-पुणे सिस्टर सिटी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सुनील केळकर म्हणाले की, हा पुतळा सापडला ही अतिशय आनंदाची बाब आहे. मात्र, या पुतळ्याच्या जीर्णोद्धारावर केळकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, पुतळ्याचे पाय कापले गेले आहेत.
वृत्तानुसार, सॅन जोसचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे व्यवस्थापक जो हेजेस म्हणाले की, “पुतळा परत मिळाल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. मला आशा आहे की, तो अशा स्थितीत असेल की ज्यामुळे तो पुन्हा बसवता येईल आणि आमच्या नागरिकांना त्याचा आनंद घेता येईल.’
यापूर्वीही झाली होती चोरी
सॅन जोसचे महापौर मॅट महान म्हणाले की, “हा पुतळा आपल्या भारतीय समुदायासाठी अतुलनीय मूल्याचा आहे, जो योद्धा-शासक छत्रपती शिवाजींबद्दलचा आमचा अभिमान आणि आदर आहे.” मराठा शासकाचा पुतळा चोरीला जाण्याची ही दुसरी वेळ आहे. सॅन जोस येथे आणल्यानंतर काही महिन्यांपूर्वी हा पुतळा घरातून चोरीला गेला होता आणि नंतर शहराच्या रस्त्यावर एका जॉगरला सापडला होता. शहरात 2002 मध्ये पुतळा बसवण्यात आला होता.
Statue of Chhatrapati Shivaji Maharaj stolen in America found in junkyard, search for thieves is on
महत्वाच्या बातम्या
- 80 अब्ज डॉलर्स, 4 देश, 470 विमानांची खरेदी : जाणून घ्या का महत्त्वाचा आहे एअर इंडियाचा ऐतिहासिक करार?आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रमुखांचा गंभीर इशारा : जागतिक अर्थव्यवस्था अजूनही ‘अत्यंत कठीण’ स्थितीत
- सर संघचालक म्हणाले : कोणतीही एक विचारधारा आणि व्यक्ती देश घडवू किंवा तोडू शकत नाहीत
- MPSC मार्फत ८१६९ पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; वाचा नवी तारीख