• Download App
    रशियन बनावटीची स्पुटनिक-व्ही लस भारतात मिळणार ९९५ रुपयांना, हैदराबादमध्ये दिला पहिला डोस |Sputanik vaccine will get in Rs 1000

    रशियन बनावटीची स्पुटनिक-व्ही लस भारतात मिळणार ९९५ रुपयांना, हैदराबादमध्ये दिला पहिला डोस

     

    हैदराबाद : रशियन बनावटीची स्पुटनिक-व्ही लस भारतामध्ये ९९५.४० रुपयांना मिळेल, असे आज रेड्डीज लॅबकडून सांगण्यात आले. ‘स्पुटनिक लाइट ही देशातील पहिली सिंगल डोस लस ठरण्याची शक्यता आहे. ही लस जूनमध्ये भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.Sputanik vaccine will get in Rs 1000

    ‘स्पुटनिक- व्ही’ च्या लसीकरणासाठी देशभर ३५ केंद्रे उभारली जाणार आहेत. या लसीचे मात्र दोन डोस घ्यावे लागतील. तिची परिणामकारकता ९१.६ टक्के एवढी आहे.



    कंपनीकडून आज या लसीची किंमत जाहीर करण्यात आल्यानंतर हैदराबादेतील तरुणाला तिचा पहिला डोस देखील देण्यात आला.या आयातीत लसीच्या किंमतीमध्ये पाच टक्के जीएसटीचा देखील समावेश आहे.

    या लशीचे जे डोस भारतामध्ये तयार होतील ते मात्र आणखी स्वस्त असण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासूनही लस खुल्या बाजारपेठेत उपलब्ध होईल. भारत सरकारने या लसीला आपत्कालीन वापरासाठी

    मान्यता दिल्यानंतर तिची पहिली खेप १ मे रोजी भारतात आली आहे. आगामी काळामध्ये आणखी काही साठा रशियातून भारतात येण्याची शक्यता आहे

    Sputanik vaccine will get in Rs 1000

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या