अमेरिकेतील विस्कॉन्सिनमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. ख्रिसमस परेडदरम्यान हा अपघात झाला. या घटनेत 20 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परेड सुरू असताना एका वेगाने लाल रंगाची भरधाव कार घुसली आणि गर्दीला चिरडत पुढे निघून गेली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. Speeding car enters America’s Christmas parade, more than 20 people injured Including many children
वृत्तसंस्था
विस्कॉन्सिन : अमेरिकेतील विस्कॉन्सिनमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. ख्रिसमस परेडदरम्यान हा अपघात झाला. या घटनेत 20 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परेड सुरू असताना एका वेगाने लाल रंगाची भरधाव कार घुसली आणि गर्दीला चिरडत पुढे निघून गेली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून चालकाची चौकशी केली जात आहे. पोलीस या घटनेचा वेगवेगळ्या अँगलमधून तपास करत आहेत.
शहर पोलीस प्रमुख डॅन थॉम्पसन यांनी सांगितले की, संशयिताचे वाहन जप्त करण्यात आले आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. काही जखमींना पोलिसांनी तर काहींना त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी घटनास्थळाजवळ न जाण्याचे आवाहन केले आहे. या घटनेच्या व्हिडिओमध्ये एक एसयूव्ही अडथळे तोडून परेड काढणाऱ्या लोकांना चिरडताना दिसत आहे.
ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. अधिकारी घटनेची माहिती गोळा करण्यात गुंतले आहेत. अमेरिकेच्या वेळेनुसार, दुपारी साडेचार वाजता वाउकेशा येथील मिलवॉकी येथे वार्षिक ख्रिसमस परेड पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले असताना ही घटना घडली. एका संशयिताची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले.
Speeding car enters America’s Christmas parade, more than 20 people injured Including many children
महत्त्वाच्या बातम्या
- सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, सुधीर मुनगंटीवार यांची महाविकास आघाडी सरकारवर टीका
- कोरोना लसीच्या बुस्टर डोसची गरज नाही, आयसीएमआरने केले स्पष्ट
- कृषि कायदे रद्द केल्याने झळाळून उठली पंतप्रधानांची प्रतिमा, मोदीच खरे शेतकरी समर्थक असल्याचे सर्व्हेक्षणात नागरिकांनी केले व्यक्त
- पाकव्याप्त काश्मीर परत मिळविणे सरकारचा पुढचा अजेंडा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा विश्वास