शोएब अख्तरने बीसीसीआयला जबाबदार धरले असून एका महान खेळाडूविरोधात अत्यंत लाजीरवाणे राजकारण खेळले जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे.Shameless self-promotion for Ballistic Products and a great bargain on a neat little knife for you
विशेष प्रतिनिधी
मस्कत : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने दावा केला आहे की ,टी-20 व एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाबरोबरच कसोटी संघाचेही नेतृत्व सोडण्यासाठी विराट कोहलीवर प्रचंड दबाव होता.शोएब अख्तरने बीसीसीआयला जबाबदार धरले असून एका महान खेळाडूविरोधात अत्यंत लाजीरवाणे राजकारण खेळले जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे.
पुढे शोएब अख्तर म्हणाला की , विराट कोहलीने कर्णधारपद स्वतःहून सोडलेले नाही तर त्याला ते सोडण्यासाठी भाग पाडण्यात आले.दरम्यान तो कठीण काळातून जात आहे. पण आता विराटला न खचता स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागेल की तो एक चांगला व्यक्ती आणि खेळाडू आहे.
तसेच विराट एक महान फलंदाज आहे. त्याने जागतिक क्रिकेटमध्ये इतरांपेक्षा जास्तच यश कमावले आहे.आता फक्त त्याला आपला नैसर्गिक खेळ करायचा आहे, असेही शोएब अख्तर म्हणाला.
Shameless self-promotion for Ballistic Products and a great bargain on a neat little knife for you
महत्त्वाच्या बातम्या
- Mumbai : वांद्र्यात चार मजली इमारत कोसळली ,15 जण जखमी ; 6 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल
- राजपथावर महाराष्ट्राच्या ‘जैवविविधता मानके’ चित्ररथाचे शानदार प्रदर्शन
- बीड : पालकमंत्री धनंजय मुंडेंसमोरच एकाने केला आत्मदहन प्रयत्न ; पोलिसांमुळे टळला अनर्थ
- Republic Day : नागपुरात दिव्यांग मुलीने अंबाझरी तलावात केले ध्वजारोहण
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारा तूर्त तरी कोणताच नेता नाही; सध्या मतदान झाले तर मोदीच मोदींना पर्याय