blood clots after AstraZeneca jab : ब्रिटनमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर 7 जणांचा मृत्यू झाला, तर 23 जण गंभीर आजारी पडले आहेत. ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर 30 जणांची प्रकृती बिघडली. ब्रिटिश वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, लसीकरणानंतर सर्वांच्या डोक्यात रक्त गोठण्याची तक्रार आढळली. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. Seven deaths in UK Due to blood clots after AstraZeneca jab
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर 7 जणांचा मृत्यू झाला, तर 23 जण गंभीर आजारी पडले आहेत. ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर 30 जणांची प्रकृती बिघडली. ब्रिटिश वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, लसीकरणानंतर सर्वांच्या डोक्यात रक्त गोठण्याची तक्रार आढळली. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका लसीवर युरोपियन देशांनी बंदी घातली होती
मार्चमध्ये काही युरोपियन देशांनी ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाची लस वापरण्यास बंदी घातली होती. लोकांना अशी भीती वाटत आहे की, ही लस घेतल्याने रक्तामध्ये गुठळ्या (blood clots after AstraZeneca jab) तयार होतात. तथापि, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की, या लसीवर बंदी घालण्यात काही अर्थ नाही. डब्ल्यूएचओचे प्रवक्ते मार्गारेट हॅरिस म्हणाले, ‘आपण अॅस्ट्राझेनेकाची लस वापरत राहिली पाहिजे. याचा उपयोग न करण्याचे कोणतेही कारण नाही.’
जगभरात 12 कोटींहून जास्त जणांना संसर्ग
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत जगभरात कोरोना विषाणूमुळे 12 कोटींहून जास्त जणांना संसर्ग झाला आहे. त्याचबरोबर या प्राणघातक महामारीमुळे एकूण 27 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
Seven deaths in UK Due to blood clots after AstraZeneca jab
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना संक्रमित फारुख अब्दुल्ला रुग्णालयात दाखल, ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून दिली माहिती
- IPL 2021 : आयपीएलवर कोरोनाचे सावट, वानखेडे स्टेडियमचे 8 ग्राउंड्समन कोरोना पॉझिटिव्ह
- Corona Outbreak : ब्राझीलमध्ये मृतदेह पुरण्यासाठी कमी पडतेय जागा, कबरी रिकाम्या करून दफनविधी
- Lockdown In Bangladesh : बांग्लादेशात कोरोनाचा भयंकर उद्रेक, देशात 5 एप्रिलपासून 7 दिवसांचे लॉकडाऊन
- महागाईचा ठसका; खाद्य तेल, डाळ, तांदळाच्या किमतींनी मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं