• Download App
    दीचा बलाढ्य अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का; फ्री किकच्या 2 संधी मेस्सीने गमावल्या saudi wins to argentina in fifa world cup

    FIFA World Cup : सौदीचा बलाढ्य अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का; फ्री किकच्या 2 संधी मेस्सीने गमावल्या

    वृत्तसंस्था

    कतार : फिफा वर्ल्ड कप फुटबॉल 2022 मध्ये पहिला जबरदस्त उलटफेर पाहायला मिळाला. लिंबू टिंबू सौदी अरेबियाने बलाढ्य अर्जेंटिनाला 1 – 2 एक असा पराभवाचा धक्का दिला. सुपरस्टार लिओनेल मेस्सी याला फ्री किकच्या 2 संधी मिळून देखील एकही गोल करता आला नाही. हा फुटबॉलच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठा धक्का ठरला saudi wins to argentina in fifa world cup

    क गटातील दोन संघ अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया यांच्यात सामना झाला. या सामन्याचा आश्चर्यकारक निर्णय लागल्याने सर्वांना मोठा धक्का बसला. सुपरस्टार लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाला. पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या वर्ल्ड कप मधील मधील तिसरा सामन्यात मोठा उलटफेर पहायला मिळाला. दहाव्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. मात्र, त्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंना आक्रमक खेळ दाखवता आला नाही.


    महिला फुटबॉल विश्वचषक आयोजनात लक्ष घाला; केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे निर्देश!!; FIFA च्या कारवाईवर 22 तारखेला फैसला


    सालेह अलशेहरीने 48 व्या मिनिटाला गोल करत अर्जेंटिनासोबत बरोबरी साधली. त्यानंतर लगेचच 5 मिनिटाने सालेम अल्दवसरीने 53 व्या मिनिटाला गोल केला आणि सौदी अरेबियाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मेस्सी अँड कंपनी टेन्शनमध्ये आली. अर्जेटिंनाने (Argentina) आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला.

    अखेरच्या 10 मिनिटात अर्जेंटिनाकडे दोन फ्री किकची (free kick) संधी चालून आली. मात्र, दोन्ही वेळेस मेस्सीला गोल करता आला नाही आणि अखेरीस बलाढ्या अर्जेंटिनाचा पराभव करत सौदी अरेबियाने पहिला विजय नोंदवला आहे. अर्जेंटिनाच्या पराभवानंतर अनेकांना मोठा धक्का बसला, तर मेस्सीच्या चाहते देखील दु:खात आहेत.

    saudi wins to argentina in fifa world cup

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही