विशेष प्रतिनिधी
मास्को : युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यानच आपल्यावर विषप्रयोग होण्याची भीती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या हजारांवर वैयक्तिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. त्यांच्या जागी आता नव्या लोकांची भरती करण्यात आली आहे.Russia’s President Vladimir Putin fear of poisoning, thousands of individual workers have been fired
रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन यांना अन्नातून विष देऊन हत्या होऊ शकते, अशी शंका आहे. गुप्तचर संस्थांच्या इनपुटनंतर पुतिन अत्यंत भयभीत झाले आहेत. यापूर्वीच, रशियन टीव्हीवर बोलताना व्लादिमीर पुतिन म्हणाले होते की, युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर रशियातही त्यांच्या विरोधात विशेष मोहीम सुरू केले जाऊ शकते. काही देशद्रोही लोक त्यांच्या विरोधात हत्येचा कटही रचू शकतात.
पुतिन यांना अन्नातून विष देऊन मारण्याची शक्यता आहे. रशियात विष देऊन मारणे, ही हत्येची सर्वसामान्य पद्धत आहे. तसेच, पुतीन कुठलेही अन्न घेण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाते. मात्र, असे असले, तरीही पुतिन यांनी आपल्या पर्सनल स्टाफमधील 1000 कर्मचारी पूर्णपणे बदलले आहेत. नौकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षा रक्षक, स्वयंपाकी आणि खाजगी सचिवांचाही समावेश आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचा संयम आता सुटत चालला असून पुढे ते अणुबॉम्बही टाकायला मागे-पुढे पाहणार नाहीत, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. रशियाने खुद्द हायपरसोनिक मिसाइल डागल्याचा दावा केला आहे.
किंझल हायपरसोनिक मिसाईल वापरून आम्ही युक्रेनच्या मिसाईल आणि विमानांच्या शस्त्रांचे मोठे भांडार उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. हा हल्ला रशियाचा पाचवा जनरल युक्रेनमध्ये मारला गेल्यानंतर करण्यात आला आहे. यामुळे अमेरिकेने रशिया अण्वस्त्रांचा वापर करणार असल्याचा इशारा दिला आहे.
Russia’s President Vladimir Putin fear of poisoning, thousands of individual workers have been fired
महत्त्वाच्या बातम्या
- अमनोरा येथे होळीच्या पार्टीत २१ मोबाईल चोरीला हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- India – Japan – Kishida – Modi : भारतावरचा विश्वास वाढला; जपानची भारतात 3.2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा!!
- आसनी’ चक्रीवादळामुळे काही ठिकाणी वादळ, पाऊस
- NCP – MIM Alliance : राष्ट्रवादीला आघाडीसाठी फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी!!; नितेश राणेंचा टोला