विशेष प्रतिनिधी
मास्को : रशियाचे अध्यक्ष ब्लादीमिर पुतीन यांनी युध्दाची घोषणा केल्यावर काही वेळातच रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव येथे पोहोचले आहे. इतर देशांनी या भांडण्यात पडल्यास खबरदार, असा इशारा रशियाने दिला आहे.Russian troops arrive near Kiev, Ukraine’s capital
आतापर्यंत 54 युक्रेनियन सैनिक आणि 10 नागरिक मारले गेले आहेत. त्याचवेळी, युक्रेनने रशियाचे 50 सैनिक मारले आणि 6 लढाऊ विमाने-टँक नष्ट केल्याचा दावा केला आहे. कीवमध्ये युक्रेनियन लढाऊ विमान कोसळले. 14 जवान शहीद झाल्याचा दुजोरा मिळाला आहे. कीवमधील भारतीय दूतावास बंद होणार नाही, असे युक्रेनमधील भारतीय राजदूतांनी म्हटले आहे.
परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले- परराष्ट्र व्यवहार मंत्रालय युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह सुमारे 18,000 भारतीयांना परत आणण्यासाठी पावले उचलत आहे. युक्रेनमधील हवाई क्षेत्र बंद आहे, त्यामुळे भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पयार्यी व्यवस्था करण्यात येत आहे.
युक्रेनचे राजदूत नवी दिल्लीत मीडियासमोर हजर झाले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदतीची विनंती केली. अमेरिका आणि युरोपियन युनियन यांनीही लष्करी आणि आर्थिक हल्ल्याची तयारी सुरू केली आहे.रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी पहाटे युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा करताच 5 मिनिटांत 13 ठिकाणी हवाई हल्ले झाले.
यात युक्रेनने प्रत्युत्तर देऊन रशियाचे 6 लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला होता. परंतु, रशिया टुडेच्या वृत्तानुसार रशियाने हा दावा फेटाळून लावला आहे. युक्रेनने रशियाचे एकही विमान पाडलेला नाही असे संरक्षण मंत्रालयाने पत्रकाद्वारे जाहीर केले.रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर हल्ल्याची घोषणा केली.
रशिया आणि युक्रेनमध्ये कोणी ढवळाढवळ केली तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील, असे धमकीवजा शब्दात त्यांनी सांगितले. या विधानानंतर पाच मिनिटांनी युक्रेनची राजधानी कीवसह अनेक प्रांतांमध्ये 12 स्फोट झाले. राजधानी कीववरही क्षेपणास्त्र हल्ला झाला. तेथे विमानतळ बंद करण्यात आले. या कारवाईमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका मोहीम थांबवावी लागली.
युक्रेन म्हणाला- आमच्यावर तीन बाजूंनी हल्ला झाला आहे… रशिया, बेलारूस आणि क्रिमिया सीमेवरून. लुहान्स्क, खार्किव, चेरनिव्ह, सुमी आणि जाटोमिर प्रांतात हल्ले सुरूच आहेत.रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जगाला आधीच धमकावले आहे की कुणीही युक्रेनची साथ दिली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. यानंतर युक्रेन सरकारने जगाला मदतीचे आवाहन केले.
आमच्यावर तिन्ही बाजूंनी रशियाचे हवाई हल्ले सुरू आहेत. तरीही आम्ही झुकणार नाही. प्रत्येक हल्ल्याला उत्तर देऊ. जगाने रशियाला उत्तर देण्याची आणि थांबवण्याची हीच योग्य वेळ आहे. असे युक्रेन सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. या दरम्यान युक्रेनने रशियाचे 6 लढाऊ विमान हाणून पाडले आहेत.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर युद्धाची घोषणा केली आहे. युक्रेनची साथ दिली तर गंभीर परिणाम भोगावे अशा शब्दांत नाटो आणि अमेरिकेला धमकावले आहे. युक्रेन काबिज करण्याचा आमचा हेतू नाही. तसेच नागरिकांना सुद्धा लक्ष्य केले जात नाही. युक्रेनच्या सैनिकांनी माघार घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या विधानानंतर लगेचच युक्रेन आणि राजधानी कीवमधील बंडखोरांच्या ताब्यातील भागात मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तानुसार, क्रमाटोस्कमध्ये 2 स्फोट झाले. रशियन सैनिक क्रिमियामार्गे युक्रेनमध्ये प्रवेश करत आहेत. तर 2 लाखांहून अधिक रशियन सैनिक सीमेवर तैनात आहेत. पूर्व युक्रेनच्या डोनेत्स्क भागात राहणाऱ्या बीबीसीच्या प्रतिनिधी सारा रेन्सफोर्ड यांनी या भागात स्फोट झाल्याची माहिती दिली.
Russian troops arrive near Kiev, Ukraine’s capital
महत्त्वाच्या बातम्या
- शेतीला आधुनिक करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतुदी, पंतप्रधानांची माहिती
- नवाब मलिक यांची उस्मानाबाद जिल्ह्यात दीडशे एकर जमीन, सिलिंगची जमीन घेताना घेतली नाही परवानगी
- किरीट सोमय्यांनी जाहीर केलेले डर्टी डझन कोण? शिवसेनेच्या पाच जणांनंतर अजित पवारांचा नंबर
- वादळामुळे बोट उलटून १६ जण बेपत्ता
- भारताच्या लस कार्यक्रमाचे बिल गेटस यांनी केले कौतुक