Russian single-dose Sputnik Light vaccine : रशियाने पुन्हा जगाला दाखवून दिले की, कोरोना लस बनवण्यात ते कुणाही पेक्षा कमी नाहीत. रशियाने सिंगल डोस लस ‘स्पुतनिक लाइट’च्या वापराला मंजुरी दिली आहे. रशियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. ही लस तयार करण्यासाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) आर्थिक मदत पुरविली आहे. Russian single-dose Sputnik Light vaccine has 79.4 pc efficacy, effective against all new coronavirus strains
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशियाने पुन्हा जगाला दाखवून दिले की, कोरोना लस बनवण्यात ते कुणाही पेक्षा कमी नाहीत. रशियाने सिंगल डोस लस ‘स्पुतनिक लाइट’च्या वापराला मंजुरी दिली आहे. रशियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. ही लस तयार करण्यासाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) आर्थिक मदत पुरविली आहे.
आरडीआयएफने एका निवेदनात म्हटले आहे की, स्पुतनिक-व्ही जी दोन डोसची लस असून 91.6 टक्के प्रभावी आहे, त्या तुलनेत सिंगल डोस असूनही स्पुतनिक लाइटने 79.4 टक्के इफिकसी दाखवली आहे. आता सिंगल डोस लस आल्यामुळे लसीकरणाला मोठी गती मिळण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आरडीआयएफने नोंदवले की, या एक डोसच्या लशीची किंमत 10 डॉलरपेक्षा कमी आहे.
स्पुतनिक-व्हीची मॉस्कोच्या गमालय संशोधन संस्थेने तयार केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 60 पेक्षा जास्त देशांनी रशियाच्या दोन डोसच्या स्पुतनिक-व्हीला वापरण्यास मान्यता दिली आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. रशियन लसीची पहिली तुकडीही भारतात पोहोचली आहे. शनिवारी रशियन विमानाने लसीचे दीड लाख डोस हैदराबादेत पोहोचले. आता ही लस आल्याने भारतातील लसीकरण मोहीम अधिक वेगवान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Russian single-dose Sputnik Light vaccine has 79.4 pc efficacy, effective against all new coronavirus strains
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातील कोरोना संकटादरम्यान ठाकरे सरकारने काढले आमदार निवासाचे बांधकाम, मनोरा उभारण्यासाठी तब्बल 900 कोटींचे टेंडर
- माजी खासदार संजय काकडेंची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड, पक्षवाढीसाठी जिवाचं रान करण्याचा व्यक्त केला विश्वास
- बंगाल हिंसाचारातील मृतांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून मदत जाहीर, प्रत्येक दोन लाखांची भरपाई
- महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, 21 कोटींचे 7 किलो युरेनियम जप्त, दोन जणांना अटक
- अनिल देशमुखांचे पाय खोलात, मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली, देशमुख पुत्रांच्या 6 बनावट कंपन्याही CBIच्या रडारवर