• Download App
    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा 130 कोटी डॉलर्सचा रुपयांचा महाल, स्ट्रिप क्लबपासून ते हुक्का लाऊंजपर्यंत ऐशारामाच्या सर्व सोई|Russian President Vladimir Putin's 1.3 billion dollars mansion, all the comforts from the strip club to the hookah lounge

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा 130 कोटी डॉलर्सचा रुपयांचा महाल, स्ट्रिप क्लबपासून ते हुक्का लाऊंजपर्यंत ऐशारामाच्या सर्व सोई

    विशेष प्रतिनिधी

    मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा 130 कोटी डॉलर्सचा रुपयांचा महाल असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या महालात स्ट्रिप क्लबपासून ते हुक्का लाऊंजपर्यंत ऐशोरामाची सगळी साधने आहेत.Russian President Vladimir Putin’s 1.3 billion dollars mansion, all the comforts from the strip club to the hookah lounge

    हा गुप्त महाल पुतीन यांच्या एक मैत्रीणीच्या नावावर आहे. त्याच्यासाठी शासकीय निधीतून अब्जावधी डॉलर्स देण्यात आले आहे. त्याचे काही फोटोही प्रसिध्द झाले आहे. या महालामध्ये स्ट्रिप क्लब म्हणजे नग्न महिलांच्या नृत्यासाठी दालन आहे.



    एका मजल्यावर कुशनसह मंद प्रकाश असलेल्या स्टेजच्या मध्यभागी एक स्ट्रिप पोल आहे. त्याचबरोबर हुक्का लाऊंज आहे. त्यामध्ये जगातील सर्वाधिक महाग हुक्का पुतीन पित असतात.समुद्रकिनारी असलेल्या या महालात थिएटर आणि कॅसिनोदेखील आहे.

    विषबाधा झालेल्या क्रेमलिनच्या कार्यकर्त्या अलेक्सी नॅव्हल्नी यांनी स्थापन केलेल्या अँटी करप्शन फाऊंडेशनद्वारे हे फोटो प्रसिध्द केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षीच या महालाचे फोटो पुढे आले होते. परंतु, आता हा महाल अस्तित्वात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    याबाबतच्या व्हिडिओला शुक्रवारपर्यंत 3.9 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले होत. मात्र, यापूर्र्वी पहिल्यांद या महालाचे व्हिडीओ समोर आले त्यावेळी 121 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. त्यामध्ये 1.35 अब्ज डॉलर्सच्या ब्लॅक सी पॅलेसच्या बांधकामासाठी त्यांनी पैसे दिल्याची बातमी आली तेव्हा पुतिन यांनी ते नाकारले होते.

    Russian President Vladimir Putin’s 1.3 billion dollars mansion, all the comforts from the strip club to the hookah lounge

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही