• Download App
    रशियाचे अध्यक्ष पुतीन २०३६ पर्यंत राहू शकणार अध्यक्षपदी, रशियन कायद्यात केला बदल|Russian President Putin will remain in office until 2036, a change in Russian law

    रशियाचे अध्यक्ष पुतीन २०३६ पर्यंत राहू शकणार अध्यक्षपदी, रशियन कायद्यात केला बदल

    रशियाचे अध्यक्ष आता आणखी १५ वर्षे म्हणजे २०३६ पर्यंत अध्यक्षपदी राहू शकणार आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना निवडणुका लढवाव्या लागतील. याबाबतच्या कायद्याला रशियामध्ये मान्यता देण्यात आली आहे.Russian President Putin will remain in office until 2036, a change in Russian law


    विशेष प्रतिनिधी

    मॉस्को : रशियाचे अध्यक्ष आता आणखी १५ वर्षे म्हणजे २०३६ पर्यंत अध्यक्षपदी राहू शकणार आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना निवडणुका लढवाव्या लागतील. याबाबतच्या कायद्याला रशियामध्ये मान्यता देण्यात आली आहे.

    रशियाचे अध्यक्ष वाल्दिमिर पुतीन लागोपाठ दुसºयांदा अध्यक्ष बनले आहेत. यापूर्वीही लागोपाठ दोन अध्यक्षपदाचे कार्यकाळ त्यांनी पूर्ण केले आहेत. एकूण चार वेळा अध्यक्ष झाल्यावर आता आणखी दोन वेळा पुतीन यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढविता यावी यासाठी कायदा मंजूर करण्यात आली आहे.



    रशियाच्या संसदेतमंजूर झालेल्या कायद्यात पुतीन यांना आणखी दोन सहा वर्षांचे कार्यकाळ मिळू शकणार आहेत. पुतीन यांच्या आताच्या अध्यक्षपदाची मुदत २०२४ पर्यंत आहे.नव्या कायद्यामुळे सध्या ६८ वर्षाचे असलेले पुतीन वयाच्या ८३ वर्षापर्यंत निवडणूक लढविता येणार आहे.

    मात्र, हे करताना भविष्यातील कोणाही अध्यक्षाला दोनपेक्षा जास्त वेळा अध्यक्ष राहण्यास बंदी घातली आहे. त्याचबरोबर कोणीही परदेशी मुळाची व्यक्ती रशियाची अध्यक्ष होऊ शकणार नाही. हा कायदा गेल्या महिन्यात संसदेच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृहात मंजूर करण्यात आली होती.

    रशियाचे अध्यक्ष पुतीन हे अत्यंत लोकप्रिय मानले जातात. त्याचबरोबर त्यांनी रशियामध्ये कोणीही प्रबळ विरोधक निर्माण होऊ दिलेला नाही. एकेकाळी केजीबीचे प्रमुख राहिलेले पुतीन हे अत्यंत कठोर राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे कायद्यामध्ये बदल करून त्यांना निवडणूक लढविण्याची मुभा दिली याचा अर्थ ते पुन्हा अध्यक्षपदी निश्चित निवडून येणार असा अर्थ आहे.

    Russian President Putin will remain in office until 2036, a change in Russian law

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या