Russia will shoot film in space : मानवी इतिहासात प्रथमच रशिया एक विक्रम प्रस्थापित करणार आहे. अंतराळ क्षेत्रात अमेरिकेसारख्या देशाला मागे टाकण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून रशिया आता थेट अंतराळात जाऊन चित्रपट निर्मिती करत आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाईल, ज्यासाठी अभिनेत्रीसह संपूर्ण क्रू मंगळवारी रवाना होईल. मिशन यशस्वी झाल्यास, रशियन क्रू या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या हॉलीवूड प्रकल्पाला मागे टाकतील. Russia will shoot film in space first ever movie crew set to leave today to iss
वृत्तसंस्था
मॉस्को : मानवी इतिहासात प्रथमच रशिया एक विक्रम प्रस्थापित करणार आहे. अंतराळ क्षेत्रात अमेरिकेसारख्या देशाला मागे टाकण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून रशिया आता थेट अंतराळात जाऊन चित्रपट निर्मिती करत आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाईल, ज्यासाठी अभिनेत्रीसह संपूर्ण क्रू मंगळवारी रवाना होईल. मिशन यशस्वी झाल्यास, रशियन क्रू या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या हॉलीवूड प्रकल्पाला मागे टाकतील.
अमेरिकन स्पेस एजन्सी नासा आणि एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने अभिनेता टॉम क्रूझसोबत एका प्रोजेक्टवर काम करण्याची घोषणा केली होती. यात अंतराळात शूट करायचे होते. पण नंतर यावर कोणतीही माहिती समोर आली नाही. तर रशिया 37 वर्षीय अभिनेत्री युलिया पेरेसिल्ड आणि 38 वर्षीय दिग्दर्शक क्लिम शिपेन्को यांना माजी सोव्हिएत कझाकिस्तानमधील बैकोनूर कॉस्मोड्रोममधून पाठवू शकते. हे लोक अनुभवी अंतराळवीर अँटोन श्काप्लेरोव्ह यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवास करतील.
काय आहे चित्रपटाचे नाव आणि कथा?
क्रू 12 दिवसांच्या मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सोयुझ एमएस -19 अंतराळयानातून जाणार आहे. ज्या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाईल त्याचे नाव आहे ‘द चॅलेंज’. चित्रपटाची वेगवेगळी दृश्ये येथे चित्रित केली जातील. या चित्रपटात एका महिला डॉक्टरची कथा दाखवली जाईल, जी अंतराळवीराला वाचवण्यासाठी ISS मध्ये जाते. रशियाची अंतराळ संस्था रोसकोस्मोसने या कथेबद्दल माहिती दिली. फ्लाइट सूट परिधान करून दिग्दर्शक शिपेन्को यांनी सोमवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत चित्रपटाला “एक प्रयोग” म्हटले होते.
चालक दल कोणत्या दिवशी परत येणार?
शिपेन्को आणि पेरेसिल्ड गेल्या सहा महिन्यांपासून आयएसएसवर असलेल्या अंतराळवीर ओलेग नोव्हिट्स्कीसह कॅप्सूलमध्ये 17 ऑक्टोबर रोजी पृथ्वीवर परत येण्याची अपेक्षा आहे. हे प्रक्षेपण अशा वेळी होत आहे जेव्हा रशियाचा अंतराळ उद्योग आव्हानात्मक काळाचा सामना करत आहे. देशातील लष्करी खर्चाला सरकार सर्वाधिक प्राधान्य देत आहे. सोव्हिएत काळाच्या तुलनेत आता रशिया नवनिर्मितीच्या बाबतीत खूपच मागे पडला आहे.
Russia will shoot film in space first ever movie crew set to leave today to iss
महत्त्वाच्या बातम्या
- Drugs Case : शर्लिन चोप्राचे शाहरुख खानवर गंभीर आरोप, म्हणाली- बॉलीवूड स्टार्सच्या बायका त्यांच्या पार्ट्यांमध्ये ‘व्हाइट पावडर’ घ्यायच्या
- थॉमस नावाच्या ‘हॅकर’मुळे इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप झाले होते ठप्प, आता अमेरिकेची एफबीआय मागावर
- Priyanka Gandhi Arrested : प्रियांका गांधींना अटक, शांतता भंग आणि कलम -144 चे उल्लंघन केल्याचा आरोप
- प्रियांका गांधी केंद्रस्थानी येत असल्याने अखिलेश यादव अस्वस्थ; निघाले उत्तरप्रदेशच्या रथयात्रेवर!!
- ‘तुम्ही शांततेची चर्चा करता, तिकडे तुमचे पंतप्रधान ओसामाला शहीद म्हणतात’ भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानला फटकारले ।