विशेष प्रतिनिधी
मॉस्को : तालीबानबरोबर चांगले संबंध निर्माण ठेवण्यासाठी आता रशियाने त्यांची तळी उचलणे सुरू केले आहे. तालीबानचा पुळका आलेल्या रशियाने म्हटले आहे की, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या सरकारच्या तुलनेत आता तालिबानच्या नियंत्रणात असलेल्या काबुलची स्थिती चांगली आहे. Russia certifies Kabul under Taliban in more controled
तालीबानला संपूर्ण जगात अतिरेकी संघटना म्हणून ओळखले जाते. मात्र, तालिबानसोबत संबंध प्रस्थापित करण्याचे संकेत रशियाने या माध्यमातून दिले आहेत. अमेरिकेचा पाठिंबा असलेले अशरफ घनी सरकार अचानक कोसळल्यानंतर तालिबानने रविवारी काबुलचा ताबा घेतला. त्यानंतर घनी यांनी देश सोडला होता. अमेरिकी सैन्याने माघार घेण्याची घोषणा केल्यापासून तालिबान काबुलचे नियंत्रण घेईल याचे संकेत प्राप्त झाले होते.
घनी यांच्या सरकारच्या तुलनेत तालिबानी नेतृत्वात काबुलची स्थिती चांगली आहे, असे वृत्त रशियातील अफगाणिस्तानचे राजदूत दिमित्री झिरनोव्ह यांच्या हवाल्याने मॉस्कोतील इखो मॉस्कव्ही या रेडिओ स्टेशनने सोमवारी दिले.
काबुलमध्ये प्रवेश केला, त्यावेळी तालिबानी नि:शस्त्र होते. काबुलमध्ये प्रवेश करताच त्यांनी विदेशातील दूतावासांना संरक्षणाची हमी दिली, असे झिरनोव्ह यांनी सांगितले.
तालिबान्यांनी काबुलमध्ये प्रवेश केल्यावर सोमवारी स्थानिकांना हॉटलाईन्स उपलब्ध करून दिल्या. कुणीही लुटालूट केल्यास, तत्काळ तालिबानसोबत संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितल्याचा जावा झिरनोव्ह यांनी केला.
Russia certifies Kabul under Taliban in more controled
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : लेबनॉनमध्ये इंधनाच्या टँकरचा भीषण विस्फोट, 28 जणांचा मृत्यू, संतप्त जमावाने टँकर मालकाचे घरही जाळले
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा, म्हणाले- आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवण्यात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका
- Lockdown In Maharashtra : ‘तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन’, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला थेट इशारा