• Download App
    रोमन कॅथॉलिक चर्चचा मानवतेविरुध्दच गुन्हा, कॅनडातील कुपर बेट इंडियन इंडस्ट्रीयल बोर्डींग स्कूलच्या जागेवर सापडल्या १६० मुलांच्या कबरी|Roman Catholic Church commits crime against humanity, graves of 160 children found on site of Cooper Island Indian Industrial Boarding School in Canada

    रोमन कॅथॉलिक चर्चचा मानवतेविरुध्दच गुन्हा, कॅनडातील कुपर बेट इंडियन इंडस्ट्रीयल बोर्डींग स्कूलच्या जागेवर सापडल्या १६० मुलांच्या कबरी

    विशेष प्रतिनिधी

    टोरांटो : युरोपीयनांप्रमाणेच कॅनडीयनांनीही मुळ रहिवाशांवर केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या आणि यामध्ये रोमन कॅथॉलिक चर्चच्या मानवतेविरुध्दच्याच गुन्ह्याची आणखी एक मालिका उघड झाली आहे. मुळ रहिवाशी असलेल्यांच्या मुलांना शिकवून प्रवाहात आणण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. आत्तापर्यंत या शाळेतील एक हजार मुलांच्या कबरी सापडल्या आहेत.Roman Catholic Church commits crime against humanity, graves of 160 children found on site of Cooper Island Indian Industrial Boarding School in Canada

    ब्रिटीश कोलंबियामधील कुपर बेटांवर रोमन कॅथॉलिक चर्चच्या वतीने ही शाळा चालविली जात होती. मुळ रहिवासी असलेल्या आदिवासींकडून बळजबरीने त्यांच्या मुलांना या शाळेत आणण्यात येत होते. या ठिकाणी दीड लाखांहून अधिक मुले शिकत होती. या मुलांवर चर्चच्या सदस्यांकडून लैंगिक अत्याचार होत होते. त्यांच्या छळामुळे हजारो विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.



    आदिवासी समाजाने भू भेदक रडाराच्या सहाय्याने ही शाळा असणाऱ्या जागी उत्खननन केले. गेल्या काही महिन्यात या ठिकाणी सापडलेल्या कबरींमध्ये एक हजारांहूनअधिक मुलांचे मृतदेह सापडले आहेत. नुकत्याच १६० कबरी सापडल्या आहेत. त्यामुळे कॅनडा आणि जगभरातून संताप निर्माण होऊ लागला आहे.

    आदिवासी समाजाचे प्रमुख जोन ब्राऊन म्हणाले, नरसंहार केल्यामुळे पेनेलकुट जमातीला मानसिक आघात सहन करावा लागला. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, या घटनेमुळे त्यांचे ह्रदय विदिर्ण झाले आहे. पेनेलकुट जमात आणि देशभरातील सर्वच आदिवासींसाठी माझ्या मनात अपार कणव आहे. त्यांना होत असलेल्या वेदनेची मला पूर्ण जाणीव आहे. गेलेल्यांना परत आणणे शक्य नाही. परंतु, त्यांना न्याय देण्याचा जरूर प्रयत्न करू.

    युनियन ऑफ ब्रिटीश कोलंबिया इंडियन चीफ्सचे माजी उपाध्यक्ष बॉब चेंबरलिन म्हणाले की, आता सापडलेले मृतदेह म्हणजे हिमनगाचे टोक आहे. अद्यापही अनेक थडग्यांचा तपास लागणे बाकी आहे. आमचे अनेक बहिण- भाऊ कुपर बेट शाळेत गेले होते. त्यातील अनेक जण परतलेच नाही.

    व्हॅनकुव्हर बेट आणि मुख्य भूमी ब्रिटीश कोलंबिया दरम्यान स्थित पेनेलकुट बेटावर 160 सामुहिक कबरी सापडल्या.रोमन कॅथोलिक चर्चने अठराव्या शतकापासून येथे कुपर बेट इंडियन इंडस्ट्रीयल स्कूल नावाने शाळा चालविली होती. कॅनडा सरकारने १९७० साली ही शाळा ताब्यात घेतली.

    Roman Catholic Church commits crime against humanity, graves of 160 children found on site of Cooper Island Indian Industrial Boarding School in Canada

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या