• Download App
    निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांनी ‘फेसबुक’विरोधात १५० अब्ज डॉलरचा अब्रुनुकसानीचा दावा|Rohingya filed suit against Facebook

    निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांनी ‘फेसबुक’विरोधात १५० अब्ज डॉलरचा अब्रुनुकसानीचा दावा

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क – वंशद्वेषी प्रचार रोखण्यात अपयश आल्याचा आरोप करत निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांनी ‘फेसबुक’विरोधात १५० अब्ज डॉलरचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. म्यानमारमधील लष्करी नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी रोहिंग्या मुस्लिमांविरोधात फेसबुकच्या माध्यमातून चिथावणी दिल्याने मोठा हिंसाचार झाल्याचा या निर्वासितांचा आरोप आहे.Rohingya filed suit against Facebook

    निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांतर्फे काही वकीलांनी कॅलिफोर्निया येथे ‘फेसबुक’ची पालक कंपनी असलेल्या ‘मेटा प्लॅटफॉर्म्स’विरोधात खटला दाखल केला आहे. फेसबुकमुळेच म्यानमारमध्ये रोहिंग्यांविरोधात मोठा अपप्रचार झाला.



    लष्करी नेत्यांनी केलेली चिथावणीखोर विधाने फेसबुकमार्फतच सर्वांपर्यंत वेगाने पोहोचल्याने हिंसाचाराला खतपाणी मिळाले आणि रोहिंग्या मुस्लिमांचा वंशच्छेद करण्याचा प्रयत्न झाला, असा दावा वकीलांनी केला आहे. ब्रिटनमधील वकीलांनीही फेसबुकविरोधात अशाच प्रकारचा खटला दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे.

    म्यानमारमध्ये रोहिंग्यांविरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार कसा झाला, याचे गेली काही वर्षे विश्लेिषण करण्याचे काम सुरु होते. म्यानमारमध्ये वंशद्वेषाला चिथावणी देणारे संदेश आणि व्हिडिओ रोखून धरण्यात अपयश आल्याचे फेसबुकच्या अंतर्गत अहवालातून उघड झाले होते.

    Rohingya filed suit against Facebook

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या