• Download App
    ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी तिहेरी धक्कादायक वर्ष; रॉड मार्श, शेन वॉर्न पाठोपाठ अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू!!Rod Marsh, Shane Warne and Andrew Symonds die in a car accident

    ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी तिहेरी धक्कादायक वर्ष; रॉड मार्श, शेन वॉर्न पाठोपाठ अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू!!

    वृत्तसंस्था

    सिडनी : ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हे तिहेरी धक्‍कादायक वर्षे ठरले आहे. रॉड मार्श, शेन वॉर्न पाठोपाठ ऑस्ट्रेलिया माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स याचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. Rod Marsh, Shane Warne and Andrew Symonds die in a car accident

    ४६ वर्षीय सायमंड्सच्या कारला क्वीन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ अपघात झाला. सायमंड्सच्या कारचा अपघात शनिवारी रात्री १०.३० वाजता झाला. सायमंड्स स्वतः कार चालवत होता. अचानक त्यांची कार रस्ता सोडून उलटली. घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्कालीन सेवांनी सायमंडला वाचवण्याचा प्रयत्न केला. अपघाताचा तपास फॉरेन्सिक क्रॅश युनिट करत आहे, अशी माहिती क्वीन्सलँड पोलिसांनी दिली आहे.

    – अँड्र्यू सायमंड्सची कारकीर्द

    ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी सामने खेळलेल्या सायमंड्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. सायमंड्स हा १९९९ ते २००७ पर्यंत क्रिकेट विश्वावर राज्य करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा महत्त्वाचा भाग होता. ऐन कसोटीच्या क्षणी त्याच्यावर विश्वास ठेवला जायचा आणि एकदा त्याने ऑस्ट्रेलियन संघाला कसोटी सामने आणि एकदिवसीय सामन्यात संकटातून वाचवले होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो अनेक क्रीडा संदर्भातील वृत्तवाहिन्यांशी जोडला गेला होता.

    आपल्या खंद्या सहकाऱ्याच्या आकस्मिक मृत्यूच्या वृत्तावर माजी यष्टिरक्षक अॅडम गिलख्रिस्टने शोक व्यक्त केला आहे. या धक्कादायक बातमीने खूप दुःखी झालोय, असे गिलख्रिस्टने ट्विटमध्ये म्हटले आहे.

    – क्रिकेटसाठी धक्कादायक वर्ष

    सायमंड्सच्या निधनामुळे ऑस्ट्रेलियासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. रॉड मार्श आणि शेन वॉर्नसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी जगाचा अचानक निरोप घेतल्यानंतर सायमंड्सचे या वर्षी निधन होणे अत्यंत क्लेशदायक आहे. ‘क्रिकेटसाठी हा आणखी एक दुःखाचा दिवस आहे’, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने सांगितले. मैदानावर आणि त्यापलीमिकडेही आमचे सुंदर नाते होते, अशा शब्दांत पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने श्रद्धांजली वाहिली आहे.

    Rod Marsh, Shane Warne and Andrew Symonds die in a car accident

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार