विशेष प्रतिनिधी
जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष जेकब झुमा यांना गेल्या आठवड्यात झालेल्या अटकेनंतर दोन प्रांतांमध्ये अनेक ठिकाणी उफाळलेला हिंसाचार अद्यापही शमण्याची चिन्हे नाहीत. अनेक ठिकाणी लुटालूटीचे प्रकार सुरु असून चेंगराचेगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या शंभरच्या वर गेली आहे.Riots erupts in south Affrica
न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी झुमा यांना १५ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली असून गेल्या आठवड्यात ते पोलिसांना शरण आले आहेत. या अटकेनंतर दक्षिण आफ्रिकेतील गुतेंग आणि क्वाझुलु-नाताल या दोन प्रांतांमध्ये अराजकता वाढली आहे. हजारो लोक मॉल आणि दुकानांमध्ये लुटालूट करत आहेत.
अन्न, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मद्य आणि कपडे यांची मोठ्या प्रमाणवर लूट केली जात आहे. त्यांना अटकाव करण्यासाठी पोलिस आणि सैनिकांना रबरी गोळ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागत आहे. अशा वेळी मोठा गोंधळ उडून चेंगराचेंगरी होत असून त्यात अनेकांचा मृत्यू होत आहे.
वाढत्या अशांततेमुळे या दोन राज्यांमधील अनेक लसीकरण केंद्रेही बंद करावी लागली असून पोलिसांनी आतापर्यंत बाराशे जणांना अटक केली आहे. अनेक नागरिकांनी एटीएम यंत्रे फोडण्याचाही प्रयत्न केला. ही यंत्रे फोडण्यासाठी स्फोटकांचा केलेला वापर काही जणांच्या जीवावर बेतला. पोलिसांच्या गोळीबारातही काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Riots erupts in south Affrica
महत्त्वाच्या बातम्या
- लष्कराची गोपनीय माहिती पाकिस्तानला देणाऱ्या दोघांना अटक
- नवज्योत सिंग सिद्धूंकडे पंजाब कॉंग्रेसची धुरा सोपविली जाणार
- कोविडचा धोका;पंतप्रधानांची सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा; उध्दव ठाकरेही सहभागी होणार
- भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणार – मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती