विशेष प्रतिनिधी
माॅस्को : अफगाणिस्तानातील निर्वासितांना स्वीकारण्यास आणि अगदी रशियाला लागून असलेल्या देशांमध्येही पाठविण्यास रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांनी कडाडून विरोध केलाय. निर्वासितांच्या बुरख्याखाली दडलेले दहशतवादी आम्हाला नकोत, असे त्यांनी अमेरिका आणि युरोपीय देशांना बजावले आहे. v
जोपर्यंत अफगाण निर्वासितांचे व्हिसा प्रक्रिया आम्ही पूर्ण करीत नाही, तोपर्यंत तालिबानच्या जाचाला- छळाला कंटाळलेल्या निर्वासितांना रशिया आणि रशियाला लागून असलेल्या मध्य आशियातील देशांनी निर्वासितांना स्वीकारावे, यासाठी अमेरिकेची धडपड चालू आहे. या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी त्यास ठाम विरोध केलाय.
“अमेरिका आणि युरोपीय देशांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. म्हणजे ते व्हिसा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्वासितांना स्वीकारणार नाहीत, पण आम्ही व मध्य आशियातील देशांनी व्हिसा नसतानाही त्यांना स्वीकारावे… असे कसे चालेल? निर्वासितांच्या बुरख्याखाली दडलेल्या दहशतवाद्यांना आम्ही का स्वीकारू?” असे पुतीन म्हणाल्याचे प्रसिद्ध झाले आहे.
रशियाला लागून असलेल्या मध्य आशियातील देशांमधील (ताजिकिस्तान, किर्गिझस्तान, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आदी) नागरिकांना रशियामध्ये व्हिसा मुक्त प्रवेश मिळतो. जर अफगाण निर्वासितांना या मध्य आशियातील देशांनी स्वीकारले तर या निर्वासितांना रशियामध्ये आपोआप प्रवेश मिळू शकतो. म्हणून या देशांमध्ये अफगाण निर्वासितांना प्रवेश देण्यास पुतीन कडाडून विरोध करीत आहेत.
Putin: we don’t want Afghan militants in Russia
महत्त्वाच्या बातम्या
- विज्ञानाची डेस्टीनेशन्स : मानवाप्रमाणेच संगणक वापरणार तर्क, संगणकाला अधिकाधिक बुद्धिमान बनवण्याचे प्रयत्न सुरू
- Corona Vaccination: महाराष्ट्रात ११ लाख नागरिकांचे विक्रमी लसीकरण; दिवसाला १० लाखांपेक्षा अधिक डोस देणे शक्य असल्याचे स्पष्ट
- अफगाणिस्तानातून परतलेल्या नागरिकांना केंद्र सरकार मोफत पोलिओ डोस देणार