वृत्तसंस्था
लंडन : केनियामध्ये चिनी व्यापाऱ्यांविरोधातील निदर्शने तीव्र झाली आहेत. येथील हजारो स्थानिक व्यावसायिक बॅनर पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी “चायनीज मस्ट गो”च्या घोषणा दिल्या.Protest against dragon in Kenya People to take to the streets against Chinese businessmen, announcement of Chinese Must Go
चिनी व्यापारी आणि चिनी कंपन्या स्थानिक व्यापाऱ्यांना संपवण्यासाठी सर्व प्रकारचे डावपेच वापरत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. चिनी व्यापारी आपला माल 45% स्वस्त विकत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. स्थानिक व्यापारी बाजारपेठेतून बाहेर फेकले जावे यासाठी नियोजनाचा भाग म्हणून चिनी व्यावसायिक हे करत असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
चिनीची धोरण, केनियन व्यापाऱ्यांचे मरण
‘आफ्रिकन न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने केवळ केनियातच नाही तर आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये नवीन प्रकारचा कट रचला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना मार्गावरून दूर करणे हा त्यांचा उद्देश आहे. यासाठी अनेक पद्धती वापरल्या जात आहेत.
केनियाबद्दल सांगायचे तर चीनने येथे चायनीज स्क्वेअर नावाने बिझनेस आउटलेट उघडले आहे. आफ्रिकन लोकांसाठी हे मॉलपेक्षा कमी नाही. स्थानिक बाजाराच्या तुलनेत येथे 45% पर्यंत स्वस्तात वस्तू विकल्या जातात. त्यामुळेच येथे सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने येतात.
चिनी वस्तू स्वस्त आहेत, पण त्यांचा दर्जा खूपच खालावलेला आहे. असे असूनही स्वस्त दराच्या जाळ्यात लोक अडकतात, परिणामी स्थानिक उत्पादनांना वाव मिळत नाही.
Protest against dragon in Kenya People to take to the streets against Chinese businessmen, announcement of Chinese Must Go
महत्वाच्या बातम्या
- उमेश पाल हत्याकांड : उत्तरप्रदेश पोलिसांकडून अतीक अहमदच्या मुसक्या आवळणं सुरू; ग्रेटर नोएडातील घरी छापेमारी
- होळीची वर्गणी घ्या, इस्लाम कबूल करा; मेरठमध्ये हिंदूंना मुसलमानांनी डिवचले; दगडफेक आणि तणाव
- माणिक साहा दुसऱ्यांदा बनणार त्रिपुराचे मुख्यमंत्री; भाजपा विधिडमंडळ बैठकीत झाला निर्णय
- कसब्याची पोटनिवडणूक देशाच्या बदलापर्यंत गेली, पण अखेरीस ती चंद्रकांतदादा – पवारांच्या शहाणपणापर्यंत खाली घसरली!!