वृत्तसंस्था
बीजिंग : रबर स्टॅम्प काँग्रेस, रबर स्टॅम्प पंतप्रधान हुकूमशहा शी जिनपिंगच्या चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसीवाल्या ली कियांगकडे कमान!!, अशी वेळ आली आहे. चीनमध्ये कोरोना काळात झिरो कोविड पॉलिसीने धुमाकूळ घातला होता, त्याचेच सूत्रधार असलेल्या ली कियांग यांच्याकडे शी जिनपिंग यांनी चीनच्या पंतप्रधान पदाची सूत्रे सोपवली आहेत. त्यावर चिनी पीपल्स काँग्रेसने शिक्कामोर्तब केले आहे. President Xi’s close confidant Li Qiang named as China’s new Premier to revive struggling economy
शी जिनपिंग यांच्या सर्वोच्च नेतृत्वावर चिनी रबर स्टॅम्प पीपल्स काँग्रेसने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे स्वतःला हवे तसे निर्णय घेण्याची आणि ते चीनवर लादण्याची अनिर्बंध मुभा जिनपिंग यांना मिळाली. त्यातूनच त्यांनी आपले अख्खे मंत्रिमंडळ बदलून टाकले आणि आपली झिरो कोविड पॉलिसी कठोरपणे अमलात आणणाऱ्या अशा ली कियांग यांच्याकडे चीनच्या पंतप्रधान पदाची सूत्रे सोपवली.
शी जिनपिंग यांच्या पाठोपाठ आता ली कियांग हे चीनचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वशक्तिमान नेते बनले आहेत. नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या 2,936 सदस्यांनी ली कियांग यांचे समर्थन केले, तर 3 जणांनी त्यांच्या विरोधात मतदान केले.
शी जिनपिंग यांच्याच सूचनेनुसार ली कियांग यांनीच चीनचे झिरो कोविड पॉलिसी तयार करून त्याची अंमलबजावणी केली. त्यावर जगभरातून टीका झाली. पण तरीदेखील जिनपिंग यांनी ली कियांग यांच्यावरच विश्वास ठेवला. शी जिनपिंग यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध असल्याने ते पंतप्रधान बनू शकले. काही काळापूर्वी ते चीनच्या टॉप 7 नेत्यांमध्येही नव्हते.
– शी जिनपिंग – ली कियांग चर्चा
मतदानापूर्वी शी जिनपिंग आणि ली किआंग यांनी एकमेकांशी संवाद साधला. चीनच्या संसदेच्या ग्रेट हॉलमध्ये मतदान केल्यानंतर माजी पंतप्रधान ली केकियांग यांनी ली कियांग यांच्याकडे पदभार सोपवला. आता जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. कियांग हे चीनमध्ये व्यवसायासाठी अनुकूल मानले जाते.
कियांग सोमवारी एक पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात ते कोरोनामुळे बुडालेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेला नव संजीवनी देण्याची योजना सांगणार आहेत. यासोबतच ते चीनच्या लोकसंख्येशी संबंधित आव्हानांवरही आपले विचार मांडतील.
झिरो कोविड पॉलिसीमुळे ली कियांग हे चीनमध्ये अप्रिय नेते बनले होते. त्या काळात ली यांनी शांघायला कोविडपासून मुक्त करण्यासाठी लोकांना घरांमध्ये कैदेत राहण्यास भाग पाडले. सर्वसामान्यांपासून ते अब्जाधीश आणि सेलिब्रिटी घरांमध्ये बंदिस्त होते. या तुरुंगवासाचे औचित्य साधून ते म्हणाले होते की, देशाला कोरोनापासून मुक्त करणे आवश्यक आहे. मात्र, या धोरणाचा परिणाम संपूर्ण जगाने पाहिला जेव्हा लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली. 1989 मध्ये तियानमेन स्क्वेअरनंतर चीनमधील हे सर्वात मोठे आंदोलन होते.
हळूहळू बंदिवासात राहणाऱ्या लोकांना राग येऊ लागला. हे पहिल्यांदा सोशल मीडियावर दिसले जिथे लोकांनी खाण्यापिण्याच्या वस्तूविषयी तक्रार करण्यास सुरूवात केली. चीनची सेन्सॉर यंत्रणाही त्यांना रोखू शकली नाही. सार्वजनिक भेटीदरम्यान, ली किआंग रुग्णालयात जात असताना त्यांना व्हीलचेअरवर बसलेल्या एका वृद्ध महिलेने थांबवले आणि कोरोनाचे संकट व्यवस्थित न सांभाळल्याने त्यांना फटकारले होते.
पण आता शी जिनपिंग यांनी ली कियांग यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे सोपवल्याने भविष्यात आपल्याच हुकूमशहाच्या नेतृत्वाखाली ली कियांग चीनची अर्थव्यवस्था कशी सुधारू शकतील??, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
President Xi’s close confidant Li Qiang named as China’s new Premier to revive struggling economy
महत्वाच्या बातम्या
- बंगळुरू-म्हैसूर प्रवास आता तीन तासांऐवजी फक्त ७५ मिनिटांत पूर्ण होणार
- Rajasthan : पुलवामातील शहीदांच्या विधवांच्या समर्थनासाठी भाजपा नेते, कार्यकर्ते उतरले रस्त्यावर
- राष्ट्रवादीच्या वाड्याला सुरूंग; जिल्हा बँक निवडणुकीत नगर नंतर जळगावातही राष्ट्रवादीला भाजपचा झटका!!
- संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची नितीन गडकरींकडून हवाई पाहणी