वृत्तसंस्था
पॅरिस : पेन्शन सुधारणा विधेयकाबाबत फ्रान्समध्ये निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शनिवारी (15 एप्रिल) निवृत्तीचे वय 62 वर्षावरून 64 वर्षे करण्याच्या वादग्रस्त विधेयकावर स्वाक्षरी केली. आता या विधेयकाला कायद्याचे स्वरूप आले आहे. फ्रान्सच्या घटना परिषदेनेही त्याला मान्यता दिली आहे.President signs pension reform bill amid massive protests in France, violence in 200 cities including Paris
निवृत्तीचे वय वाढवणारा कायदा लवकरच देशभर लागू होणार आहे. हा निर्णय आल्यापासून फ्रान्समधील पॅरिससह 200 शहरांमध्ये हिंसाचार वाढला आहे. अल जझिराने शनिवारी याबाबत माहिती दिली.
नवीन पेन्शन योजना संविधानाच्या दृष्टीने योग्य ठरवली
फ्रेंच मीडियानुसार, संविधान परिषदेच्या 9 सदस्यांनी नवीन पेन्शन योजनेला घटनेच्या दृष्टीने योग्य ठरवले आहे. फ्रान्समधील पॅरिसमध्ये शुक्रवारी (13 एप्रिल) न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर पोलिसांनी सुमारे 112 आंदोलकांना ताब्यात घेतले. पेन्शन योजनेच्या विरोधात गेल्या तीन महिन्यांपासून फ्रान्समध्ये हिंसक निदर्शने सुरू आहेत.
अल जझीराच्या वृत्तानुसार, मॅक्रॉन यांच्या दुसऱ्या कार्यकाळात या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठीचा लढा हा सर्वात मोठा अडथळा होता. दरम्यान, या विधेयकातील दुरुस्तीसाठी जनतेचा प्रचंड विरोध झाला. याशिवाय त्यांची लोकप्रियताही कमी झाली आहे.
सप्टेंबर महिन्यापासून होणार लागू
फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर आता पेन्शन योजनेचे कायद्यात रूपांतर झाले आहे. फ्रान्सच्या न्यायालयाने नवीन पेन्शन योजनेअंतर्गत 6 प्रस्ताव फेटाळले आहेत. फेटाळलेल्या प्रस्तावात एक प्रस्ताव असा आहे, ज्यामध्ये 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किती लोकांना कोणत्या कंपनीत नोकरी दिली आहे, अशी विचारणा करण्यात आली आहे.
न्यायालयाने या कायद्याला मंजुरी दिल्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी या वर्षी सप्टेंबरपर्यंत होऊ शकते, अशी माहिती सरकारने दिली. जानेवारी 2023 मध्ये अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पेन्शन योजनेत सुधारणा करण्याबाबत बोलले होते.
President signs pension reform bill amid massive protests in France, violence in 200 cities including Paris
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : गँगस्टर अतिक अहमदच्या 44 वर्षांच्या गुन्ह्यांची कहाणी, दहशतीचा एका मिनिटात झाला अंत
- अतीकच्या हत्येने तुटला “तो” धागा; अतीक तपास यंत्रणांना देणार होता ISI – दहशतवादी गटांच्या nexus ची माहिती!!
- प्रयागराज मधील दहशतीचा अंत; अतीक अहमद, अशरफ अहमद यांची तिघांकडून निर्घृण हत्या; अतीक आयएसआय, लष्कर ए तैय्यबाशी संबंधी देणार होता माहिती!!
- BREAKING NEWS : माफिया डॉन अतिक अहमदची भाऊ अशरफसह गोळ्या झाडून हत्या!