• Download App
    फ्रान्सच्या राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्या कानशिलात एकाने सर्वांसमोर लगावली थप्पड, दोन जणांना अटक । President Macron slapped by man during trip to southeast France

    चारचौघात फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्या कानशिलात लगावली थप्पड, दोन जणांना अटक

    President Macron slapped : मंगळवारी प्रेक्षकांच्या गर्दीत फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना एका व्यक्तीने चापट मारली. दक्षिण फ्रान्समधील या घटनेच्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने पदयात्रेच्या वेळी राष्ट्रपतींना थप्पड लगावली होती. मॅक्रॉन यांच्या सुरक्षा पथकाने ताबडतोब राष्ट्रपतींवर हात उगारणाऱ्याला पकडले आणि मॅक्रॉन यांनाही त्याच्यापासून दूर नेले. President Macron slapped by man during trip to southeast France


    वृत्तसंस्था

    पॅरिस : मंगळवारी प्रेक्षकांच्या गर्दीत फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना एका व्यक्तीने चापट मारली. दक्षिण फ्रान्समधील या घटनेच्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने पदयात्रेच्या वेळी राष्ट्रपतींना थप्पड लगावली होती. मॅक्रॉन यांच्या सुरक्षा पथकाने ताबडतोब राष्ट्रपतींवर हात उगारणाऱ्याला पकडले आणि मॅक्रॉन यांनाही त्याच्यापासून दूर नेले.

    बीएफएम टीव्ही आणि आरएमसी रेडिओच्या वृत्तानुसार या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मॅक्रॉन दक्षिण-पूर्व फ्रान्समधील ड्रॉम क्षेत्राच्या दौर्‍यावर जात असताना ही घटना घडली. त्यांनी कोरोना साथीच्या आजारानंतर रेस्टॉरंट्स मालक आणि विद्यार्थ्यांशी जनजीवन कसे सामान्य होत आहे, याबद्दल चर्चा केली.

    दरम्यान, त्या व्यक्तीने राष्ट्रपतींना थेट चापट मारण्याचे कारण अद्याप समोर आले नाही. परंतु या घटनेची चर्चा जगभरात सुरू आहे. फ्रान्समध्ये इस्लामविरोधी धोरणांसाठी अनेक गट आग्रही आहेत.

    फ्रान्समधील सिनेटने नव्या ठरावाच्या समर्थनार्थ मतदान केल्यावर एप्रिलमध्ये सोशल मीडियावर मुस्लिम समुदायातर्फे रोष निर्माण झाला होता. या ठरावात सार्वजनिक ठिकाणी 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना हिजाब घालण्यास बंदीची तरतूद आहे. हा प्रस्ताव ‘फुटीरतावादी’ विधेयकाचा एक भाग आहे. हा अद्याप लागू झालेला नाही. महिनाभरापूर्वी स्वित्झर्लंडच्या मतदारांनीही बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्यासाठी मतदान केले होते.

    President Macron slapped by man during trip to southeast France

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र