• Download App
    भारतासोबत महासत्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि जपानचे प्रधानमंत्री योशिहिदो सुगा यांच्यासोबत चर्चा President Biden phones PM Modi to discuss Covid; US jolted into action after criticism of silence over India's plight

    भारतासोबत महासत्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि जपानचे प्रधानमंत्री योशिहिदो सुगा यांच्यासोबत चर्चा

    • अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदी असताना कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला होता. यावेळी भारताने वेळोवेळी मदत केली होती.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली:भारतात कोरोनाच्या बिघडत्या परिस्थितीत जागतिक  महासत्ता भारताच्या पाठीशी उभ्या राहिल्या  आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात सोमवारी फोन वर संभाषण झाले.तत्पूर्वी  जपानचे पंतप्रधान योशिहिदो सुगा यांनीही मोदींशी फोनवर चर्चा केली. President Biden phones PM Modi to discuss Covid; US jolted into action after criticism of silence over India’s plight

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये सोमवारी रात्री उशीरा बातचित झाल्याचे समोर आले आहे. दोघांमध्ये आपापल्या देशांमधील कोरोना परिस्थितीबाबत चर्चा झाली. मोदींनी सांगितले की, अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत कोरोना संकटाबाबत चर्चा झाली. या संकटात भारताला साथ दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांचे आभार मानले.

    पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये कोरोना लस, औषध आणि आरोग्य साधनांच्या पुरवठ्याबाबत चर्चा झाली. यादरम्यान जो बायडेन यांनी या कोरोनाच्या संकटात अमेरिका भारतसोबत असल्याचा विश्वास दाखवला.

    “आम्ही दोन्ही देशांतील कोरोनाच्या परिस्थितीविषयी तपशीलवार चर्चा केली. तसंच अमेरिकेकडून भारताला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानले,” अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली. “लसीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या आणि औषधांच्या पुरवठ्याबाबतही आमची महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. भारत अमेरिका या दोन्ही देशांमध्ये असलेली आरोग्य क्षेत्रातील भागीदारी कोरोनाचं जागतिक आव्हान सोडवू शकते,” असंही ते म्हणाले.

    ते म्हणाले की, अमेरिका व्हेंटिलेटर आणि इतर साधन भारताला देईल. शिवाय कोविशिल्ड लसीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्चा माल लवकरात लवकर उपलब्ध केला जाईल. याबाबत मोदींना जो बायडेन आणि अमेरिकेचे आभार मानले. मोदींनी यावेळी लसीच्या मैत्रीबाबत देखील सांगितले की, कोवॅक्स आणि क्वाड लसीच्या पुढाकाराच्या माध्यमातून भारत दुसऱ्या देशांना कोरोना लस उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे लस आणि औषध तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा सुनिश्चित करावा, असे मोदी बायडेन यांना म्हणाले.

    अमेरिकेची डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आगामी काळात भारताला २०२२ च्या अखेरपर्यंत १०० कोटी कोरोना डोस तयार करता येतील इतक्या कच्च्या मालाच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणार आहे.

    यापूर्वी रविवारी एमएसए अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या एमएसए जेक सुलिवन यांच्याशी बातचित केली होती. ज्यानंतर अमेरिका कोरोना लसीच्या कच्चा मालावरील निर्यातीवर लावली रोख हटवण्यास तयार झाले होते.

    President Biden phones PM Modi to discuss Covid; US jolted into action after criticism of silence over India’s plight

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही